जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'कधी कधी स्थानिक..' देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कर्नाटकमध्ये पराभूत होण्याचं कारण

'कधी कधी स्थानिक..' देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कर्नाटकमध्ये पराभूत होण्याचं कारण

फडणवीसांनी सांगितलं कर्नाटकमध्ये पराभूत होण्याचं कारण

फडणवीसांनी सांगितलं कर्नाटकमध्ये पराभूत होण्याचं कारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक विधानसभा निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 14 मे : कर्नाटक मध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपला पराभवाची धूळ चारत राज्यात काँग्रेसनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. काँग्रेसच्या या विजयावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अनेक निवडणुका जिंकतो, काही निवडणुका हरतो, आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याच कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्ट्राईक रेटचा उल्लेख केला आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस कर्नाटक विधानसभा निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की आम्ही अनेक निवडणुका जिंकते, काही निवडणुका आम्ही हरतो, आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याच कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. कधी कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात ज्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. यापेक्षाही मोठा मूर्खपणा काय असतो? कालच्या निवडणुकीत भाजपने का नाही केलं? काही लोकांना मुर्खासारखे बोलायची सवय झाली आहे. त्यांना सल्ला आहे डोकं आपटून पाहा ( जितेंद्र आव्हाडांना) असा टोला त्यांनी आव्हाड यांना लगावला. आमच्या पराभवाचं विश्लेषण आम्ही करू, ते करण्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको, असंही त्यांनी म्हटलं आहे. कोण होणार मुख्यमंत्री? कर्नाटकमध्ये ऐतिहासिक कामगिरीनंतर काँग्रेससमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यातून कुणाची निवड करायची? हा संघर्षाचा मुद्दा असणार आहे. सिद्धरामय्या अनुभवी आहेत. त्यांच्याकडे सरकार चालविण्याचाही अनुभव आहे. सिद्धरामय्या 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. तर डी. के. शिवकुमार आव्हान स्वीकारणारे नेते आहेत. तसंच सोनिया गांधी यांची मर्जी राखणारे नेते असल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जातं आहे. वाचा - कर्नाटक विजयावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले; राहुल गांधींचं कौतुक, भाजपच्या डोळ्यात झणझणीत अंजन काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र, आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिलेले काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांचंही नावही समोर येऊ शकतं. नावावर सहमती झाल्यास खरगे यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छापूर्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटकात विविध मंत्रिपदे, केंद्रात मंत्रिपद, लोकसभेचे गटनेतेपद अशी विविध पद खरगे यांनी भुषवली आहेत. आता काँग्रेस हायकमांड कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात