जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चॉकलेट ते पेरूपर्यंत 'इथं' मिळतात 15 प्रकारच्या शेवया, पारंपारिक व्यवसायातून महिला करतेय लाखोंची कमाई, Video

चॉकलेट ते पेरूपर्यंत 'इथं' मिळतात 15 प्रकारच्या शेवया, पारंपारिक व्यवसायातून महिला करतेय लाखोंची कमाई, Video

चॉकलेट ते पेरूपर्यंत 'इथं' मिळतात 15 प्रकारच्या शेवया, पारंपारिक व्यवसायातून महिला करतेय लाखोंची कमाई, Video

खिचडीपासून वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरला जाणारा शेवया हा पदार्थ तुम्हाला माहिती असेल. या पारंपारिक शेवया व्यवसायाला देखील आता आधुनिक स्वरुप मिळालं आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 17 एप्रिल : खिचडीपासून वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरला जाणारा शेवया हा पदार्थ तुम्हाला माहिती असेल. या पारंपारिक शेवया व्यवसायाला देखील आता आधुनिक स्वरुप मिळालं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील महिलेनं   मोठ्या मेहनतीनं या व्यवसायात स्वत:चा ब्रँड तयार केला आहे. त्यांनी विकसित केलेल्या या ब्रँडची अनेकांना भुरळ पडली असून जगभरातून या शेवयांना मागणी आहे. कसा झाला प्रवास? छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरात राहणाऱ्या छाया जगदीश साबदे यांचं शालेय शिक्षण छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये झालं.सरस्वती भुवन महाविद्यालयात त्यांनी बीए पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांचा विवाह जगदीश साबदे यांच्याशी झाला.जगदीश यांचं छोटे दुकान आहे.यामुळे घर खर्च भागान्यासाठी छाया यांनी सुरुवातीला कंपनीमध्ये शिक्षिका म्हणून काम केलं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    घरागुती कारणांमुळे छाया यांना ते काम सोडावं लागलं. घरी असताना त्यांनी मेस देखील चालवली.या दरम्यान परिसरातील महिलांशी चर्चा करून नागरिकांच्या गरजा जाणून घेतल्या. या चर्चेनंतर 2011 साली त्यांनी मिरची दळण्याची छोटी गिरणी सुरू केली. त्यांचा या व्यवसायात जम बसला. परिसरातील महिला त्यांच्याकडे येऊ लागल्या. शेवयानं बदललं आयुष्य गिरणीचा व्यवसाय सुरू असतानाच त्यांना महिलांना रेडिमेड शेवयाची गरज लक्षात आली. त्यामधून त्यांनी 2016 साली घरी शेवया बनवायला सुरूवात केली. यावेळी एकाच पद्धतीनं शेवया न बनवता वेगवेगळ्या फ्लेवरच्या शेवया बनवण्यास त्यांनी सुरूवात केली. 100 वर्षांहून जुनी घड्याळं ‘इथं’ केले जातात दुरुस्त, पाहा जुन्या घड्याळ्यांची अनोखी दुनिया, Video अन् सुचला शेवायाचा व्यवसाय…. या दरम्यान रेडीमेड शेवायाची महिलांना गरज असते, हे छाया यांच्या लक्षात आलं.  ही गरज लक्षात घेऊन त्यांनी 2016 साली घरच्या घरी शेवाळ्या बनवायला सुरुवात केली शेवया बनवताना त्यांनी पारंपारिक एकाच पद्धतीच्या शेवया न बनवता वेगवेगळ्या फ्लेवरच्या शेवया देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संभाजीनगरच्या वसंतराव नाईक कृषी केंद्रामध्येही प्रशिक्षण घेतलं. तब्बल 15 फ्लेवरच्या शेवया…. छाया साबदे यांच्याकडे आता एक दोन नव्हे तर तब्बल 15 फ्लेवरच्या शेवया उपलब्ध आहेत.यामध्ये बीट,टोमॅटो, पालक, पुदिना, सिताफळ,आंबा, चॉकलेट, जांभूळ, पेरूसह दुधाच्या फ्लेवरच्या शेवाया उपलब्ध आहेत.  त्याचबरोबर  सोयाबीनवर प्रक्रिया करून 20 प्रकारचे पदार्थ तयार करतात. ‘या पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही नैसर्गिक पद्धतीने सर्व पदार्थ होतात,’ अशी माहिती छाया यांनी दिली.  फळे पालेभाज्या व्यापाऱ्यांकडून खरेदी न करता थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. यामागे शेतकऱ्यांना थेट लाभ व्हावा हा त्यांचा उद्देश आहे. शेवयांची मागणी वाढल्यानं त्यांनी आता आधुनिक पद्धतीच्या मशिन विकत घेतल्या आहेत. 90 टक्के अपंगत्व आलं; पण हार मानली नाही, तरुणाने जे करून दाखवलं ते अभिमानास्पद, VIDEO छाया साबदे यांच्याकडे नैसर्गिक पद्धतीनं केलेल्या शेवया मिळता. त्यामुळे  विदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्यांच्याकडे आवर्जून ऑर्डर देत असतात. सध्या त्यांचा महिन्याकाठी आठ ते दहा लाख रुपये टर्न ओव्हर आहे. त्याचबरोबर काही महिलांनाही त्यांनी रोजगार दिला आहे. ‘आमच्याकडं  शेवया बनवताना  केमिकलाचा वापर केला जात नाही. ग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ देण्याचा प्रयत्न असतो. ग्राहकांचा विश्वास कायम राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. भविष्यात सिध्दी गृह उद्योग जागतिक पातळीचा ब्रँड तयार करून ज्यास्तीत ज्यस्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे,’ असं साबदे यांनी यावेळी सांगितलं. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे कंपनीमध्ये काम करत होते. पण, ते ठिकाण दूर होतं. त्यामुळे या नोकरीत मुलांकडे दुर्लक्ष होत होतं. मला या ठिकाणी कामाची माहिती मिळाली या ठिकाणी काम करून मला सुरक्षित वाटतं. त्यासोबत चांगला रोजगारही मिळतो, असं मत येथील कर्मचारी वंदना घुले यांनी व्यक्त केलं. संपर्क - +91 89990 56693

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात