छत्रपती संभाजी नगर, 21 जुलै : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गेवराई येथील शेतकरी एकेकाळी रोजगार हमीच्या कामावर मजूर म्हणून जात होते. मात्र, डाळिंबामुळे लवकरच येथील या शेतकऱ्यांची उलाढाल हजारांत, लाखांत होत गेली आहे. गेवराई गावाला आर्थिक सुबत्ता आली आहे. अनेकांनी आपल्या शेतातंच टुमदार असे बंगले बांधले आणि आता चार चाकी गाड्यांचे मालकही इथले शेतकरी झाले आहेत. या गावात घरोघरी डाळींबाच्या बागा आहेत म्हणूनच या गावाची ओळख ही डाळीबांच गाव म्हणून होतं आहे. कशी साधली किमया? छत्रपती संभाजीनगर च्या पैठण तालुक्यातील गेवाराई हे 1 हजार 700 लोकसंख्याचं गाव आहे. या गावात दुष्काळ जणूकाही पाचवीलाच पुजलेला होता. पण या गावाच्या लोकांची हिम्मत या दुष्काळापेक्षा ही जास्त मजबूत आहे. आणि त्याच जोरावर या गावाने आज स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या गावातल्या शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीत उतरून गावाचं रूपच बदलून टाकलं आहे.
या गावातील शेतकरी अमोल आगलावे यांनी सांगोला या गावामध्ये पहिल्यांदा डाळिंबाची बाग पाहीली होती. या गावाकडे बघून 2009 ला गेवराईमध्ये पहिल्यांदा डाळिंबाचं रोप लावलं गेलं. डाळिंब हे बांधावरचं पीक मात्र गावातल्या तरुणांनी याचं महत्त्व ओळखलं आणि त्याची लागवड केली. सुरुवातीला लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. पण याच डाळिंबातून जेव्हा चांगलं उत्पन्न मिळालं तेव्हा इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हे पीक घेण्यास सुरुवात केली. गावामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे आणि हलक्या जमिनीमुळे अनेक शेतकरी हे पीक घ्यायला धजत नव्हते. मात्र एकमेकांची साथ लाभल्याने हिम्मत आली आणि त्यांनी गावाचा कायापालट करण्याचा निश्चय केला. तेव्हा बागांच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. नेहमी दुष्काळात असलेलं हे गाव. डाळिंब शेतीला पाण्याची गरज होती म्हणून आगलावे गेवारई गावातल्या शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा पर्याय निवडला. कोणी व्यक्तीगत तर कोणी सामूहिक शेततळी घेतली. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा संरक्षित पाण्याची सोय झाली. गावात आता डाळिंब बागेच्या बाजूला एक तरी शेततळं आहे आणि अशी जवळपास शंभर पेक्षा अधिक शेततळे गावात आहेत.
तिखट मिरची झाली गोड! फक्त 30 गुंठे लागवडीतूनच शेतकरी झाला लखपती
गेवराईमध्ये जवळपास 200 एकरावर ही डाळिंबाची लागवड आहे. येथील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या दारात आज हैदराबाद, दिल्ली, मुंबई यांसारख्या देशातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये हे डाळिंब व्यापारी स्वतः खरेदी करून नेतात आणि विकतात. या डाळिंब बागांमुळे गेवराई हे गाव संपूर्णतः हिरवाईने नटलं आहे. चांगला आर्थिक फायदा आम्ही 2012 साली एक एकारावर डाळींबाची बाग लावली. मात्र, पाणी टंचाई जाणवत असल्याने आम्ही कृषी विभागाकडून शेत तळे घेतले आणि त्या पाण्यांचे योग्य नियोजन करून डाळींब शेती करतोय. आज आमच्याकडे आठ एकारावर डाळींबाची बाग आहे. यातून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळत असून चांगला लाखोंची कमाई होत आहे, असं डाळींब उत्पादक शेतकरी बप्पासाहेब आगळे यांनी सांगितले. आमच्या गावातील काही शेतकरी डाळींब शेती करत होते. त्यावेळी आम्ही पारंपारिक पद्धतीने पिके घेत होतो. परंतु, या शेतकऱ्यांकडून पाहुण आम्हीही डाळींब लावाचा निर्णय घेतला आणि आठ वर्षांपुर्वी डाळींबाची लागवड केली आणि त्याचं डाळींबाच्या पैशातून आज आम्ही घर बांधकाम करत आहे, असं डाळींब उत्पादक शाईनाथ आगलावे यांनी सांगितले.
Ahmednagar News : दुष्काळी भागातील गाव बनलं टोमॅटोचं आगार, 200 एकरमध्ये केली विक्रमी लागवड, Video
डाळिंब शेती यशस्वी केली गेवराई येथे मोठ्या प्रमाणात डाळिंबाची बाग आहे. या गावात पाणीटंचाई असल्याने येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून सामूहिक, वैयक्तिक शेततळ्याचा लाभ घेत डाळिंब शेतीसाठी त्या शेततळ्यातील पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून डाळिंब शेती यशस्वी केली आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत त्यांना वेळोवेळी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते, असं पैठण कृषी सहाय्यक अधिकारी सोनी वाघ यांनी सांगितले आहे.

)







