जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : सातजन्मी सुद्धा अशी बायको नको, चक्क पुरूषांनी साजरी पौर्णिमा, असं का केलं? Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : सातजन्मी सुद्धा अशी बायको नको, चक्क पुरूषांनी साजरी पौर्णिमा, असं का केलं? Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : सातजन्मी सुद्धा अशी बायको नको, चक्क पुरूषांनी साजरी पौर्णिमा, असं का केलं? Video

छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीपीडित पुरूषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. असं का केलं?

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर 2 जून : राज्यात उद्या वटपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पुजा करून सात जन्म तोच पती मिळावा अशी प्रार्थना करते. मात्र, या जन्मातच काय पुढच्या सातजन्मी सुद्धा अशी बायको नको, असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीपीडित पुरूषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली आहे. शहरातील वाळूज परिसरामध्ये आज पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. या जन्मातच काय पुढच्या सातजन्मी सुद्धा अशी बायको नको,असा घोषणा देत पिंपळाच्या झाडाला उलट्या 121 प्रदक्षिणा घालत त्यांनी पूजन केले. दरवर्षी छत्रपती संभाजीनगरातील पत्नी पीडित आश्रमचे सभासद ही पिंपळ पौर्णिमा साजरी करत असतात.

News18लोकमत
News18लोकमत

पुरुषांवर अन्याय सुरू दिवसेंदिवस पुरुषांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत चालली आहे. महिला अबला होत्या त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे कायदे करण्यात आले. परंतु सदर कायदे बनवताना पुरुषांवर अन्याय होऊन पुरुष अबला होतील याचा विचारच न केल्याने आज खऱ्या अर्थाने पुरुष हतबल होऊन ,पुरुष अबला झाला आहे. त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. एक पुरुष ज्या वेळेस लग्न करतो तो फार मोठ्या अशा उराशी बाळगतो आणि मोठ्या उत्सुकतेने लग्न करतो परंतु त्याला हे माहित नसते की,त्याच्या स्वप्नाचे लग्न होताच तुकडे तुकडे होणार आहे. बहुतांश बायका ह्या लग्न होताच पतीचा तिटकारा करायला सुरुवात करतात व या ना त्या कारणावरून पती सोबत भांडण तंटा करतात. आज काल बहुतांश बायका ह्या आपल्या पतीचा केवळ बुजगावण्यागत वापर करतात. केवळ लग्नाचा शिक्का मारला की नंतर त्यांना नवरा नावाला परंतु त्यांची संपत्ती पैसा हेच पाहिजे असते, अशी भावना पिडीत पुरुष आश्रमातील सदस्यांनी बोलून दाखवली.

Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजीनगरमध्ये वाढले प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण, पाहा काय आहे कारण Video

कुटुंब उद्ध्वस्त करते पत्नी केवळ आपल्या पतीवरच केस दाखल करत नाही तर, त्याच्या संपूर्ण कुटुंबावर केसेसचा मारा करून सर्व कुटुंब उद्ध्वस्त करते. अशावेळी पती हतबल होतो. तो पोलिसात तसेच न्यायालयात दाद मागण्यास जातो तेव्हा त्यास दाद मिळत नाही. पोलीस मदत करत नाही आणि पोलिसात मदत मिळाली नाही तर तो मोठ्या आशेने न्यायालयात धाव घेतो परंतु न्यायालयात देखील पिडीतांच्या पदरात निराशा पडते. एकदा की पत्नीला आपल्या पतीकडून पोटगी मिळण्यास सुरुवात झाली की जन्मभर त्याची तिच्या तावडीतून सुटका होत नाही. पत्नी आपल्या पतीवर एक नाही तर अनेक जसे 498 अ,डोमेस्टिक व्हायलन्स,सी आर पी सी 125 ,307 आय पी सी अश्या अनेक केसेसचा मारा करते . अशावेळी त्यांच्यावर केसेसचा भडिमार झाल्यास तो आयुष्यातून उद्ध्वस्त होतो आणि अखेर जेल मध्ये जातो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो ( N.C.R.B.) च्या नुसार आपण बघितले तर जवळ जवळ 78 टक्के विवाहित पुरुष आत्महत्या करताना दिसत आहे. त्याच्या तुलनेत केवळ 22 ते 23 टक्के महिला आहे ,महिलांचे प्रमाण कमी आहे ही बाब वाखाणण्या लायक आहे. अशीच पुरुषांच्या बाबतीत देखील व्हावे आणि पुरुषांना देखील न्याय मिळावा, अशी मागणी या पुरुषांनी केली.

Vat Purnima 2023 : वटसावित्रीची पूजा करताना चुकूनही करू नका 3 गोष्टी, पाहा महत्त्वाचा Video

पत्नी पीडितांच्या प्रमुख मागण्या - पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा - एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी - प्रत्तेक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी . - जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करावे . - कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे. अश्या बहुतांश मागण्या आहेत परंतु कुणी आयकून घ्यायला तयार नाही म्हणून ह्या पिंपळास साकडे घालून आश्रमाच्या वतीने पिंपळाची मनोभावे पूजा करून त्यांच्या कडे पीडितांचे गार्‍हाणे मांडले, ‘’कि आता देव तरी आमचे म्हणणे आयकेल’’ आणि ह्या दुष्ठ बायकांच्या तावडीतून पत्नी पीडितांची सुटका करेल यासाठी आज रोजी पत्नी पिडीत पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष एड.भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ,एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, प्रवीण कांबळे, भिक्कन चंदन, श्रीराम तांगडे, संजय भांड, एड.अमोल घुगे .एड अमोल होनमाने ,तसेच इतर मोठ्या संखेने उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात