जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजीनगरमध्ये वाढले प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण, पाहा काय आहे कारण Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजीनगरमध्ये वाढले प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण, पाहा काय आहे कारण Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजीनगरमध्ये वाढले प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण, पाहा काय आहे कारण Video

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्लास्टिक सर्जरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. नेमकं कारण काय?

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर 1 जून : सुंदर दिसाव ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करत असतो. यामध्येच काही जण प्लास्टिक सर्जरीचा मार्ग अवलंबतात. सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये प्लास्टिक सर्जरी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही प्लास्टिक सर्जरी करण्यामध्ये तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिक सर्जरीत वाढ  छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या प्लास्टिक सर्जरी करण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात प्रमाणात वाढले आहे. यामध्ये सर्वात जास्त नाकांची प्लास्टिक सर्जरी केली जात आहे. नाकाचा शेप बदलणे किंवा एखाद्या अभिनेता,अभिनेत्री सारखी नाक करणे यासाठी तरुणाईचा जास्त कल आहे. त्याचबरोबर ओठांची सर्जरी केली जात आहे. ओठ लहान मोठे करणे ओठांचा आकार बदलणे हे केले जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

त्याचबरोबर जन्मताच चेहऱ्यावर काळे डाग असणे किंवा मोठ्या प्रमाणात तीळ असणे यांची सुद्धा प्लास्टिक सर्जरी केली जात आहे. तसेच ब्रेस्ट इम्प्लांट सुद्धा केले जात आहे.  शहरात सध्या यांचं प्रमाण हे उन्हाळ्यामुळे जास्त आहे. उन्हाळ्यामध्ये लग्नसराई असल्या कारणास्तव तरुणाई प्लास्टिक सर्जरी मोठ्या प्रमाणात करत आहेत, असं छत्रपती संभाजीनगरमधील प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन तज्ञ डॉ.उज्ज्वला दहिफळे यांनी सांगितले आहे. काय कारण? वर्षभर बघितलं तर महिन्यामध्ये किंवा आठवड्यामध्ये एक ते दोन नाकाच्या सर्जरी होतात किंवा त्याचबरोबर एक ब्रेस्ट इम्प्लांट सुद्धा केले जातात. पण जसा उन्हाळा सुरू होतो आणि लग्नसराई सुरू होते. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार या नाकाच्या सर्जरी केल्या जात आहेत आणि एक ते दोन ब्रेस्ट इम्प्लांट सुद्धा केले जात आहेत. क्लासिक सर्जरी जर व्यवस्थित किंवा नीट केली तर त्याची जास्त काही साईड इफेक्ट होत नाहीत. प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी लोक येतात ते आम्हाला सांगतात की मला अभिनेता,अभिनेत्री सारख दिसायचं आहे किंवा आमचे लग्न जुळत नाही. यामुळे प्लास्टिक सर्जरी करतात, असं सुद्धा उज्ज्वला दहिफळे यांनी सांगितले.

Onion Water : कांद्याचे पाणी पिण्याचेही असतात इतके अद्भूत फायदे! वाचून तुम्हीही चकित व्हाल!

कोणत्या प्लास्टिक सर्जरी होतात? नाक,ओठ, ब्रेस्ट इम्प्लांट, जन्मताच चेहऱ्यावर काळे डाग असणे या अवयवांच्या प्लास्टिक सर्जरी मोठ्या प्रमाणात होतात. किती येतो खर्च? प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी कमीत कमी खर्च 25 हजार ते जास्तीत जास्त खर्च दीड लाखापर्यंत येतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात