जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News: हाताच्या इशाऱ्यावर होणार लाईट, फॅन सुरू; दिव्यांगांसाठी अनोख्या यंत्राची निर्मिती

Chhatrapati Sambhaji Nagar News: हाताच्या इशाऱ्यावर होणार लाईट, फॅन सुरू; दिव्यांगांसाठी अनोख्या यंत्राची निर्मिती

Chhatrapati Sambhaji Nagar News: हाताच्या इशाऱ्यावर होणार लाईट, फॅन सुरू; दिव्यांगांसाठी अनोख्या यंत्राची निर्मिती

Chhatrapati Sambhaji Nagar News: हाताच्या इशाऱ्यावर होणार लाईट, फॅन सुरू; दिव्यांगांसाठी अनोख्या यंत्राची निर्मिती

फॅन किंवा लाईट सुरू करण्यासाठी स्विच ऑन-ऑफ करण्याची गरज नाही. आता हाताच्या एका इशाऱ्यावर ही कामे होणार आहेत.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 29 जून: फॅन किंवा लाईट सुरू करण्यासाठी आता स्विच ऑन-ऑफ करण्याची गरज नाही. आता हाताच्या एका इशाऱ्यावर ही कामे होणार आहेत. आपला विश्वास बसणार नाही पण छत्रपती संभाजीनगर शहरातील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांने एक यंत्र विकसित केलंय. कुठलीही हालचाल न करता हाताच्या इशाऱ्यावर लाईट, फॅन चालू किंवा बंद करता येणार आहेत. विशेष म्हणजे गुरूप्रीत सिंग सिद्धू यानं बनवलेलं हे यंत्र दृष्टीनहिन, दिव्यांग व्यक्तींसाठी वरदान ठरणार आहे. गुरुप्रीत तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा विद्यार्थी छत्रपती संभाजी नगरमधील सिंधी कॉलनीमध्ये गुरुप्रीत सिंग सिद्धू हा विद्यार्थी राहतो. गुरुप्रीतचे वडील काच बसवण्याचं काम करतात. त्याला एक बहीण आणि एक भाऊ आहे. गुरुप्रीत हा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. तो तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून त्यानं दिव्यांगांसाठी उपयुक्त अनोखं यंत्र तयार केलंय.

News18लोकमत
News18लोकमत

कशी सुचली कल्पना? काही दिवसांपूर्वी गुरुप्रीत हा रुग्णालयामध्ये गेला होता. तिथे त्याला एक दिव्यांग व्यक्ती दिसली. या व्यक्तीला उन्हाळा सुरू असल्यामुळे फॅन सुरू करायचा होता. मात्र तो स्ट्रेचरवर असल्यामुळे त्याला स्वतः उठून फॅन लावणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याला इतरांची मदत घ्यावी लागली. दिव्यांग आणि दृष्टिहीन व्यक्तींची ही अडचण लक्षात घेऊन आपल्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग गरजू लोकांना व्हावा, आसा विचार त्याचा मनात आला. त्याला त्याच्या या प्रोजेक्टची कल्पना या प्रसंगावरून सुचली. अनेक अडचणीनंतर यंत्र तयार गुरुप्रीतनं या प्रोजेक्टवर काम करायचं ठरवलं. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करायला सुरुवात केली. या प्रोजेक्टचं कोडींग स्वतः च तयार केलं. साच्या तयार केला. एक लाकडी फळी घेऊन त्यावरती चार लाईट, एक फॅन बसवला आणि त्यानंतर त्याची फिटिंग केली. हे यंत्र तयार करत असताना गुरुप्रीतला अनेक अडचणी आल्या ते सोडवताना त्यांनी कुणाचीही मदत न घेता स्वतःच यावरती प्रचंड मेहनत करून हे यंत्र तयार केलं. महाराष्ट्रात आहे ‘बुलेटचं गाव’, पाहा कसं पडलं नाव?, PHOTOS दिव्यांगांनाही हाताळता येणार इलेक्ट्रॉनिक उपकरणे गुरुप्रीतनं यंत्र तयार करण्यासाठी त्याला एक मोठा प्लायउड, चार लाईट, एक छोटा फॅन, सेन्सर, कॅमेरा, लॅपटॉप, मोशन डिटेक्शन डिवाइस आदीचा वापर केला. या प्रोजेक्ट नुसार शारीरिक मर्यादा असलेल्या व्यक्ती सहजतेने घरगुती उपकरणे जसे की लाईट, पंखे, वातानुकूलन, हीटिंग सिस्टम, मनोरंजन साधने आणि बरेच काही चालवू शकतात. व्हॉईस कमांड, सानुकूल करण्यायोग्य इंटरफेस आणि अंतर्ज्ञानी नियंत्रणे समाविष्ट करून, प्रकल्पाने यशस्वीरित्या एक सर्वसमावेशक वातावरण तयार केले आहे. पाच हजारांत मशीन तयार प्रकल्पाच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचे विविध प्रकारच्या अपंगत्वांशी जुळवून घेणे. गतिशीलता असलेल्या व्यक्तींसाठी, सिस्टीम हाताने जेश्चर-आधारित नियंत्रणे, आय-ट्रॅकिंग तंत्रज्ञान आणि सहाय्यक उपकरणांद्वारे प्रवेश करण्यायोग्य स्विचेससह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वर्षभराची मेहनत करून तयार करण्यात आलेल्या एलओटी होम ऑटोमेशन प्रोजेक्टला 5 हजार रुपयाचा खर्च आला आहे. भावी इंजिनिअरची कमाल, दिव्यांगांसाठी बनवली सौर सायकल प्रोजेक्ट सर्वांना फायद्याचा ठरेल माझ्या या प्रोजेक्टचा दिव्यांग व्यक्तींना तसेच सर्व व्यक्तींना फायदा आहे. यासाठी दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहण्याची गरज असणार नाही. सर्वांसाठी चांगलं काम देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. हा प्रोजेक्ट सर्वांसाठी फायदेशीर ठरेल अशी आशा आहे, असे गुरुप्रीत सिंग म्हणाला. तर गुरुप्रीत सिंग हा प्रचंड मेहनती विद्यार्थी आहे. तो आमच्या विभागासह इतर विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांना देखील मदत करतो. त्याने या प्रोजेक्टवर प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे प्राध्यापक डॉ. धूत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात