जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : पाण्याचा एकही थेंब जाणार नाही वाया, सातवीतल्या मुलींचं भन्नाट संशोधन, Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : पाण्याचा एकही थेंब जाणार नाही वाया, सातवीतल्या मुलींचं भन्नाट संशोधन, Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : पाण्याचा एकही थेंब जाणार नाही वाया, सातवीतल्या मुलींचं भन्नाट संशोधन, Video

पाण्याचा एकही थेंब आता वाया जाणार नाही. वाया जाणाऱ्या पाण्यावर विद्यार्थिनींनी उपाय शोधला आहे.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 5 जुलै : मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न हा गंभीर आहे. शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो दोन्ही ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे ही काळाची गरज बनली आहे. अनेक लोक पाणी भरल्यानंतरही वाया जाऊ देतात. त्याकडे लक्ष देत नाहीत. हीच गोष्ट लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर मधील शारदा कन्या प्रशालेच्या इयत्ता सातवी शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनींनी उपाय शोधला आहे.  यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होणार आहे. काय शोधला उपाय? छत्रपती संभाजीनगरमधील शारदा कन्या प्रशालामध्ये शिकणाऱ्या सातवीतल्या सानवी देशपांडे, शब्दा शुक्ला, केतकी भाले, याज्ञी कुलकर्णी, अस्मिता भेहरे या पाच विद्यार्थ्यांनी मिळून ‘वॉटर लेवल डिटेक्टर’ हा प्रोजेक्ट त्यांनी तयार केला आहे. यामुळे पाणी वाया जाण्यापूर्वीच बझर वाजेल आणि मोटारीचे बटणही बंद होईल. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होईल.

News18लोकमत
News18लोकमत

कसा तयार केला प्रोजेक्ट? विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षांमध्ये वेगवेगळे उपक्रम करायला दिले जातात. शारदा कन्या प्रशालेच्या दांडेकर मॅडम यांनी त्यांना या प्रयोग करायला सांगितला आणि त्यांना हा प्रोजेक्ट करण्यासाठी मदत सुद्धा केली. त्यांच्या या प्रोजेक्टमुळे पाण्याची बचत होईल. विद्यार्थिनींनी शाळेतील अटल टिंकरिंग लॅबमधील टाकाऊ साहित्याचा वापर करून हे वॉटर लेव्हल डिटेक्टर बनवले आहे. पाण्याची बचत होईल आपण कामात असताना किंवा नळाला पाणी आल्यानंतर आपण टाकीमध्ये पाणी सोडतो त्यानंतर आपण कशात तरी व्यस्त होतो आणि टाकी भरत आली तरी आपल्याला समजत नाही. यामुळे पाणी हे वाया जाते. पण वॉटर लेव्हल डिटेक्टरमुळे टाकी भरल्यानंतर सेंसर ऑटोमॅटिकली मोटारीचे बटन बंद करेल आणि यामुळे पाण्याची बचत होईल, असं विद्यार्थिनींनी सांगितले.

Chhatrapati Sambhaji Nagar News : 70 ते 80 टक्के विजेची होणार बचत, विद्यार्थिनींनी मिळून तयार केला खास प्रोजेक्ट,Video

मला सार्थ अभिमान आहे की आमच्या शाळेतल्या विद्यार्थिनींनी एवढा चांगला प्रोजेक्ट तयार केला आहे. मराठवाड्यामध्ये पाण्याची समस्या खूप मोठी आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी यावरती काम केलं यामुळे याचा उपयोग नक्कीच समाजाला होईल, मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात