जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : शेगावची प्रसिद्ध कचोरी वेगळी कशी? तयार करण्याचा काय आहे फॉर्म्युला, पाहा खास VIDEO

Chhatrapati Sambhaji Nagar News : शेगावची प्रसिद्ध कचोरी वेगळी कशी? तयार करण्याचा काय आहे फॉर्म्युला, पाहा खास VIDEO

Chhatrapati Sambhaji Nagar News : शेगावची प्रसिद्ध कचोरी वेगळी कशी? तयार करण्याचा काय आहे फॉर्म्युला, पाहा खास VIDEO

शेगावमधील कचोरी संभाजीनगरमध्ये मिळत असून खवय्यांची पसंती या कचोरीला मिळत आहे. ही कचोरी तयार करण्याचा फॉर्म्युला काय आहे पाहा

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 30 मे : कचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. वेगवगेळ्या शहरात ही कचोरी खवय्यांना खायला मिळते.  छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ही कचोरी  खायला मिळत असून या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी असते. कशी झाली सुरुवात? टी आर शर्मा यांनी 1950 रोजी शेगाव येथील रेल्वे कॅन्टीनमध्ये ही कचोरी सुरू केली आहे. टी आर शर्मा यांनी त्यांचा पाच मुलांसोबत या व्यवसायाला सुरुवात केली होती. या पाच मुलांची मुले आता त्यांचा व्यवसाय चालवत आहेत. आज त्यांची तिसरी पिढी आहे या व्यवसायामध्ये आहे. सध्या ही कचोरी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये प्रसिद्ध आहे.

News18लोकमत
News18लोकमत

संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 17 वर्षांपासून प्रसिद्ध शेगावची कचोरी खवय्यांना खायला मिळते. शहरामध्ये सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रोड वरती तिरथराम करमचंद शर्मा शेगाव कचोरी सेंटर आहे. येथील कचोरी सध्या छत्रपती संभाजीनगर मधील खवय्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत असून दिवसाला 800 ते 1000 खवय्ये इथे येऊन कचोरी खातात, असं येथील कामगार भागवत सडपदार सांगतात. कशी बनवली जाते कचोरी? कचोरी ही सहसा मूग डाळीपासून बनवली जाते. पण शेगाव कचोरी ही हरभऱ्याच्या डाळी पासून बनवली जाते. यामध्ये ते त्यांचा सिक्रेट मसाला वापरतात आणि कचोरी सोबत हिरवी चटणी ते खायला देतात. या कचोरीची किंमत 15 रुपये आहे.

  Chhatrapati Sambhaji Nagar : भन्नाट सँडविच खाण्यासाठी ‘इथं’ जायला हवं, 27 वर्षांपासून जपलीय चव, Video

कचोरीची चव काही निराळीच मी अनेक वर्षांपासून इथे कचोरी खाण्यासाठी येतो. तिथल्या कचोरीची चव बाकीच्या कचोरीपेक्षा काही निराळीच असते आणि बाजारापेक्षा पाच रुपयांनी तेही कचोरी स्वस्त भेटते. इथली स्वच्छता आणि या कचोरीमध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला तेलाचा वास येणार नाही, असे खवय्ये रामेश्वर भंडारी हे सांगतात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात