सुशील राऊत,प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च : रोजचं जेवायला किंवा घरी स्वयंपाक करण्यास कंटाळा आल्यावर चटकादार खाण्याचा पर्याय अनेक जण निवडतात. भेळ, पाणी पुरी, रगडा पॅटीस हे फास्ट फुड यामुळेच सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत. यासोबतच सॅंडविच हा पदार्थ देखील चांगलाच फेमस झाला आहे. छत्रपती संभाजीनगरकरांना सॅंडविच खाण्याची इच्छा झाली तर शहरातील एका सॅंडविचा पर्याय आम्ही सांगणार आहोत.
कधी झाली सुरुवात?
छत्रपती संभाजीनगर शहरातील गोपाळ टी चौकात 27 वर्षांपासून महालक्ष्मी सॅंडविच सेंटर फेमस आहे. नरेंद्र यादव यांनी महालक्ष्मी सॅंडविच सेंटरची शहरात सुरुवात केली. नरेंद्र हे पूर्वी मुंबई शहरामध्ये वडापावची गाडी चालवत होते. दरम्यान त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये वडापावची गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. वडापावची गाडी सुरू केली मात्र वडापावला सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर त्यांनी ग्राहकांची मागणी बघून सँडविच तयार करून विक्री करायला सुरुवात केली. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच सुरू केले. सध्या त्यांच्याकडे शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून ग्राहक आवर्जून सँडविच खाण्यासाठी येत असतात. यासोबतच पुणे, मुंबई,नागपूर, नाशिक आणि अहमदनगर यासारख्या शहरातून देखील ग्राहक सँडविच खाण्यासाठी येत असतात.
भरभरून प्रेम दिले
गेल्या 27 वर्षांपासून आम्ही शहरात महालक्ष्मी सॅंडविच सेंटर चालवत आहोत. या ठिकाणच्या ग्राहकांनी आमच्या सँडविच सेंटरला भरभरून प्रेम दिले आहे. महागाई वाढत असली तरी आम्ही या ठिकाणी ग्राहकांना दर्जेदार साहित्य वापरून चांगलं सँडविच उपलब्ध करून देतो. भविष्यातही ग्राहकांची विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असं नरेंद्र यादव यांनी सांगितले.
कोणते सँडविच मिळतात?
1) बेस्ट चीझ सँडविच
2) एक्स्ट्रा चीझ सँडविच
3) पनीर चीझ सँडविच
4) वेज चीझ सँडविच
5) कॉर्न चीझ सँडविच
6) प्लेन चीझ सँडविच
7) (डब्बल) प्लेन चीझ सँडविच
8) जॅम चीझ सँडविच
9) ब्रेड बटर सँडविच
10) आलू चटणी सँडविच
कुठे आणि कधी मिळत सँडविच?
तुम्हाला जर सँडविच खायची इच्छा झाली असेल तर छत्रपती संभाजीनगर शहरातील गोपाळ टी चौकामध्ये लक्ष्मी सँडविच सेंटर आहे. हे सँडविच सेंटर दुपारी 3 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहतं.
संपर्क: 93 22 37 17 23, 88 88 90 55 24
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.