जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : 2 वर्षीय चिमुकलीने अवघ्या 40 सेकंदामध्ये केला रेकॉर्ड, VIDEO पाहून कराल कौतुक

Chhatrapati Sambhaji Nagar News : 2 वर्षीय चिमुकलीने अवघ्या 40 सेकंदामध्ये केला रेकॉर्ड, VIDEO पाहून कराल कौतुक

Chhatrapati Sambhaji Nagar News : 2 वर्षीय चिमुकलीने अवघ्या 40 सेकंदामध्ये केला रेकॉर्ड, VIDEO पाहून कराल कौतुक

छत्रपती संभाजीनगर शहरामधील 2 वर्षीय चिमुकलीने कमाल केली आहे. 40 सेकंदामध्ये शरीरातील संपूर्ण अवयवांचे नावे सांगून आपल्या नावे रेकॉर्डची नोंद केली आहे.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 20 जून : लहान मुलं म्हटलं की त्यांना खेळणे आणि मज्जा मस्ती करणे यातच रुची असते. पण छत्रपती संभाजीनगर शहरामधील 2 वर्षीय चिमुकलीने कमाल केली आहे.खेळणे आणि मज्जा मस्ती करण्याबरोबरच अवघ्या 40 सेकंदामध्ये शरीरातील संपूर्ण अवयवांचे नावे सांगून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामधील या 2 वर्षीय चिमुकलीचे नाव कनक मुंदडा आहे. कनक जेव्हा 15 महिन्याची होती तेव्हापासून तिची मेमरी शार्प होती.  तेव्हापासून तिला प्रत्येक गोष्टींची ओळख करून देण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिला प्राण्यांची ओळख, वर्णमाला एबीसीडी त्याचबरोबर सोलर सिस्टिम याची माहिती दिली. त्यानंतर कनक फ्लॅश कार्ड्सद्वारे सर्व गोष्टींची ओळख सांगू लागली. कनकने जेव्हा 40 सेकंदामध्ये सर्व अवयवांची नावे सांगितली तेव्हा हा रेकॉर्ड कोणाच्याच नावावर नव्हता. त्यामुळे तिच्या वयोगटामध्ये हा रेकॉर्ड तिच्या नावावर झाला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नवीन रेकॉर्ड केला ती जेव्हा 15 महिन्यांची होती तेव्हा तिची मेमरी शार्प आहे असं माझ्या लक्षात आलं. तेव्हा पासून मी तिला सर्व गोष्टींची ओळख करून द्यायला सुरुवात केली. नंतर आम्ही तिला फ्लॅश कार्ड आणून तिला अवयवांच्या नावाची ओळख केली आणि तिने दोन दिवसांमध्ये हे संपूर्ण फ्लॅश कार्ड लक्षात ठेवले. नंतर तिने अवघ्या 40 सेकंदांमध्ये हा फ्लॅश कार्ड बघून शरीरातील सर्व अवयवांची नावे सांगितले. नंतर आम्ही बुक ऑफ रेकॉर्डसाठी तिचं नाव पाठवलं. अशा प्रकारे तिने तिच्या नावावर हा नवीन रेकॉर्ड केला याचा मला खूप अभिमान आहे, असं कनकची आई ममता मुंदडा यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhaji Nagar News : 5 वर्षीय चिमुकल्यानं कमाल केली! 22 सेकंदात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे घेत केला विश्वविक्रम Video

 या गोष्टीचा मला खूप अभिमान 

खरं सांगायचं झालं तर कनकच्या रेकॉर्ड मुळे आज आम्हाला सर्वजण ओळखतात आणि या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. आमच्या घरामधील सर्व जणांना कनकचा खूप जास्त अभिमान आहे. जेव्हा पण मी घराच्या बाहेर पडतो तेव्हा मला सगळेजण कनकचे वडील चालले असे म्हणतात. ही गोष्ट ऐकून खूप छान वाटत आणि भविष्यात तिला जे व्हायचे आहे ते तिने बनावे. त्यासाठी आमचा तिला पूर्ण सपोर्ट असेल, असं कनकचे वडील अमर मुंदडा यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात