अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 9 जून : सध्या लहापणापासूनच मुले आपले नाव कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात गाजवताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील गुरुकुल ऑलिम्पियाड शाळेत शिकणाऱ्या प्रणित अक्षय बाहेती या अवघ्या 5 वर्षीय मुलाने देखील नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. प्रणितने अवघ्या 22 सेकंदात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे घेत आधीचा विश्वविक्रम तोडून नवा विश्वविक्रम रचला आहे. या विश्वविक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नुकतीच करण्यात आली आहे. याआधी 9 वर्षाच्या मुलाने 39 सेकंदात हा विश्वविक्रम केला होता. कसा कला विश्वविक्रम? प्रणितने याआधीही कमी वयात जास्तीत जास्त गणिताचे पाढे म्हणण्याचा विश्वविक्रमही केलेला आहे. तसेच जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत पदक मिळवून खेळातही आपली चमक दाखवली होती. प्रणितने दोन दिवस प्रॅक्टिस केली पहिल्या दिवशी त्याने एका तासामध्ये 21 जिल्ह्यांची नावे न चुकता सांगितली आणि नंतर जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड केला तेव्हा त्याने अवघ्या 22 सेकंदामध्ये 36 जिल्ह्यांची नावे सांगितली. 22 सेकंदात 36 जिल्ह्यांची नावे न थांबता आणि न अडखळता त्याने सांगितली.
कशी सुचली कल्पना? हा विश्वविक्रम असा सुचला की याच्या आधी एका 9 वर्षाच्या मुलाने 39 सेकंदामध्ये केला होता ही बातमी वाचली होती. घरी चर्चा केली आणि प्रणितला 36 जिल्ह्यांची नावे वाचून दाखवली आणि त्याच्याकडून ती पाठ करून घेतली. पहिल्या दिवशी त्यांना एका तासांमध्ये 21 जिल्ह्यांची नावे न चुकता सांगितली होती. दोन दिवस त्याची प्रॅक्टिस करून घेतली आणि नंतर जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर 22 सेकंदामध्ये 36 जिल्ह्यांची नावे म्हणून दाखवली आणि हा नवीन विषय विक्रम त्याच्या नावावर झाला. एक वडील म्हणून मला प्रणितचा खूप अभिमान आहे, असं प्रणितचे वडील अक्षय बाहेती यांनी सांगितले.