सौरभ पांडे, प्रतिनिधी शहडोल, 13 जुलै : सध्या अनेक ठिकाणी टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. मात्र, टोमॅटोचे दर वाढल्यामुळे एका परिवारात एक धक्कादायक घटना घडली. ही घटना मध्यप्रदेश राज्यातील शहडोलच्या बेम्हौरी येथे घडली. इथे एका पत्नीने आपल्या पतीने पत्नीला न विचारता भाजीमध्ये 2 टोमॅटो टाकले. याचा पत्नीला राग आला आणि ती घर सोडून निघून गेली. सोबतच ती आपल्या मुलीलाही सोबत घेऊन गेली. पत्नी घर सोडून गेल्यावर पतीची वाईट अवस्था झाली असून त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आपल्या पत्नीला परत आणावे, अशी मागणी त्याने केली आहे. तर पोलीस म्हणाले की, तक्रारदार व्यक्तीच्या पत्नीची माहिती मिळाली आहे. ती संतापात आपल्या बहिणीच्या घरी उमरिया येथे गेली आहे.
सजीव वर्मा असे पतीचे नाव आहे. त्याने सांगितले की, मी एक छोटासा ढाबा चालवतो. यासोबत जेवणाचे डबेही पुरवतो. तीन दिवसांपूर्वी जेवणाच्या डब्यांसाठी घरात भाजी तयार होत होती. त्यावेळी मी माझ्या बायकोला न विचारता दोन टोमॅटो कापून त्यात टाकले. हे पाहताच माझ्या पत्नीला राग आला. टोमॅटो इतके महाग आहे आणि तुम्ही भाजीत 2 टोमॅटो टाकले. यावरुन आमच्या दोघांत भांडण झाले. भांडण झाल्यावर मी धनपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी मी पोलिसांना सांगितले की, माझी पत्नी सकाळी बसमध्ये बसून कुठेतरी निघून गेली आहे. तसेच ती आपल्या मुलीलाही सोबत घेऊन गेली आहे. मी तिला परत आणायचा प्रयत्न करत आहे. मात्र, मी भाजीत टोमॅटो टाकल्यामुळे तिला राग आला आहे. जोपर्यंत टोमॅटोचे दर आधीसारखे सामान्य होत नाही तोपर्यंत मी त्याचा वापर भाजासाठी नाही करणार, फक्त पोलिसांनी त्याच्या पत्नीला आपल्या मुलीसह वापस बोलवावे, अशी शपथही या व्यक्तीने पोलिसांसमोर घेतली. तर टोमॅटोमुळे पती-पत्नीत झालेल्या या वादाची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे.