राष्ट्रवादीला मोठा धक्का? छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर, मुंबईत तातडीने बोलावले

राष्ट्रवादीला मोठा धक्का? छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर, मुंबईत तातडीने बोलावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीत भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात आहे.

  • Share this:

नाशिक, 20 ऑगस्ट- काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीत भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात आहे.

भुजबळांना तातडीने बोलावले..

काँग्रेस-राष्ट्रवादीने या पार्श्वभूमीवर मुंबईत संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी भुजबळ यांना तातडीने बोलावण्यात आले आहे. मतदारसंघाचा दौरा अर्धवट सोडून भुजबळ मुंबईला रवाना झाले आहे. येवल्यातील विसापूर येथे भुजबळ मंगळवारी दौऱ्यावर होते. भुजबळ सेनेत गेल्यास नाशिक जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल घडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर मात्र भुजबळ यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

तुम्ही बाळासाहेबांना दिलेला त्रास जनता विसरली नाही..

दरम्यान, छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असली तरी भुजबळांनी शिवसेनेतून कडाडून विरोध होत आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या विरोधात बॅनर लावत त्यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला होता. या बॅनरवर छगन भुजबळ यांचा 'लखोबा लोखंडे' असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नाही तर 'भुजबळ यांनी आहेत तिथेच राहावं. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना दिलेला त्रास जनता आणि शिवसैनिक विसरलेली नाही, असेही बॅनरवर नमूद करण्यात आले होते. 'केसात गजरा आणि गावभर नजरा' अशा काहीतरी नावाचे पूर्वी तमाशात वग नाट्य व्हायचे. त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्याशी मिळतेजुळते वाटते! उगवला दिवस की मी परत येतो… साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरू शकत नाही. आपण आहे तिथेच राहा” असा मजकूर लिहून रवींद्र तिवारी या शिवसैनिकाने छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

मी शिवसेनेत जाणार ही निव्वळ अफवा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवनेनेत जाणार या वृत्ताचा खुद्द भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण शिवबंधन बांधून घेणार नसून आपल्या मनगटावर घड्याळच राहील असे सांगत शिवसेना प्रवेशाची चर्चा ही निव्वळ अफवा असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 01:40 PM IST

ताज्या बातम्या