जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास, ते वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास, ते वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास, ते वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यातील एका कथित विधानावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    कोल्हापूर, 28 ऑक्टोबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये युतीच्या झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषद रविवारी घेतली होती. यावेळी एका वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. कोल्हापूरबद्दल केलेल्या त्या विधानाची चर्चा सर्वत्र सुरू होती. आता त्यावर चंद्रकांत दादांनी एक व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकार परिषदेत मी व्हॉटसअपवर आलेले मेसेज वाचून दाखवले. जो मेसेज वाचून दाखवला त्यामध्ये शेवटचं वाक्यही होतं. त्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा अपमान होईल असं वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नााही असं त्यांनी म्हटलं. विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागा जिंकता आल्या नाहीत. तर सेनेची गेल्यावेळी असलेली सहा आमदारांची संख्या एकावर आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असूनही त्यांनी पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली. कोथरूड मध्ये विजय मिळवणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना त्यांचा कोल्हापूरचा गड मात्र राखता आला नाही. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पराभवाला बंडखोरी कारणीभूत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी एक व्हॉटसअप मेसेज वाचून दाखवला. या मेसेजमध्ये भाजपनं गेल्या पाच वर्षात केलेली कामं सांगण्यात आली होती. यातच शेवटी म्हटलं होतं की, सगळं जग सुधारेल, पण कोल्हापूर सुधारणार नाही. पत्रकार परिषदेत व्हॉटसअप मेसेजची प्रिंट देण्यात आली होती. त्याचाच फोटो व्हायरल झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं. चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की, कोल्हापूरमधील पराभवाची चिकित्सा करण्यासाठी काल पत्रकार परिषद घेतली गेली. त्यावेळी दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असलेला मेसेज वाचून दाखवला. त्यामध्ये भाजपने 5 वर्षांत केलेली कामे होती. मेसेजमधील सकारात्मक मुद्दे मी वाचून दाखवले. त्यातील शेवटच्या मुद्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरचा उपमर्द करणारे वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नाही. कोल्हापूरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. शेवटी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण, म्हणाले…

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात