नवी दिल्ली 14 मार्च : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वाढता धोका पाहता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोविड-19 ला आपत्ती घोषित केलं आहे. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाला 4 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय साथरोग प्रतिबंध कायदाही लागू करण्यात आला आहे. सरकारने कोरोनाव्हायरसला आपत्ती (Notified Disaster) घोषित केलं आहे. ज्यामुळे कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मदत मिळू शकेल. राज्याच्या डिजास्टर रिस्पॉन्स फंडमार्फत (Disaster Response Funds - SDRF) मदत म्हणून निधी दिला जाईल. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपये मिळतील. यामध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आणि या रुग्णांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही कुटुंबाचा समावेश आहे.
कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता देशात साथरोग प्रतिबंध कायदा (Epidemic diseases act) लागू करण्यात आला आहे. 123 वर्ष जुना हा कायदा आहे. एखाद्या आजाराला आळा घालण्यात सर्व प्रयत्न अयशस्वी होत असतील, तेव्हा हा कायदा लागू केला जातो. राज्यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार दिले जातात.
#COVID19, which has claimed over 5,000 lives across the world, is less than six months old, but to combat the pandemic, the Centre has invoked a 123-year-old #EpidemicDiseasesAct, which has been historically used to contain the spread of #swineflu, #cholera, #malaria and #dengue. pic.twitter.com/dLfh1Niquz
— IANS (@ians_india) March 14, 2020
महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. महाराष्ट्रात 22 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. पुण्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 10 रुग्ण आहेत. तर नागपूर आणि मुंबईत प्रत्येकी 4, यवतमाळमध्ये 2, ठाणे आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. पुण्यातील दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सगळ्या शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Sanjeeva Kumar, Special Secretary (Health), Union Health Ministry: Total number of positive #Coronavirus cases in India is 84. pic.twitter.com/gKsiA8RaW8
— ANI (@ANI) March 14, 2020
भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण 84 रुग्ण आहेत. त्यापैकी 10 रुग्ण बरे झालेत, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक इ. राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आहेत.