मुंबई, 11 एप्रिल : बाबरी मशीद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना युटर्न घेतला आहे. ते म्हणाले की, बाळासाहेबांबाबत माझ्या मनात श्रद्धा आहे. त्यांच्या अनादराचं पाप आम्ही करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतील हिंदू जिवंत आहेत. बाबरी ही हिंदूंनी पाडली आणि त्याचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेनं केलं होतं. कोणत्याही एका पक्षाने पाडला नाही असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, माझा थेट प्रश्न होता की संजय राऊत कुठे होते? बाळासाहेबांबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. मुंबईत दंगली व्हायच्या तेव्हा जवळून बाळासाहेबांना पाहिलं. अयोध्येत बाबरी मशिद पाडताना शिवसैनिक होते की नव्हते. माझा प्रश्न संजय राऊत कुठे होते हा आहे.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचं नेहमीच होतं. राजकीय हेतू ठेवणारे वाद काढतात. गेल्या काही दिवसात माझ्या वक्तव्यांचा ध चा मा करणं होतंच. बाळासाहेबांचा अपमान केला असा आरोप मी सहन करणार नाही. बाळासाहेबांचे ऋण आम्ही जाणतो. बाबरी पाडण्यामध्ये हिंदूंचा समावेश होता, तसंच बाबरीचा ढाचा हा कोणत्याही एका पक्षाने पाडला नाही असं म्हणणं असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. Uddhav Thackeray : तुम्ही कुणाला जोडे मारणार आता? उद्धव ठाकरेंची पाटलांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्यावर मी काही म्हणणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू माणसांवरचं ऋण कुणीच पुसू शकत नाही. शिवसैनिक होते पण शिवसेना म्हणून नव्हते. हिंदू म्हणून होते. विश्व हिंदू पऱिषदेच्या नेतृत्वाखाली होते असा पुनरुच्चार चंद्रकांत पाटील यांनी केला.