जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chandrakant Khaire : सत्तार हा हिरवा साप त्याला आम्ही ठेचणार, ठाकरे गटाच्या नेत्याकडून जहरी टीका

Chandrakant Khaire : सत्तार हा हिरवा साप त्याला आम्ही ठेचणार, ठाकरे गटाच्या नेत्याकडून जहरी टीका

Chandrakant Khaire : सत्तार हा हिरवा साप त्याला आम्ही ठेचणार, ठाकरे गटाच्या नेत्याकडून जहरी टीका

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जळगाव आणि सिल्लोड येथील सभेंना परवानगी न दिल्याने चांगलेच वातावरण चिघळले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 नोव्हेंबर : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जळगाव आणि सिल्लोड येथील सभेंना परवानगी न दिल्याने चांगलेच वातावरण चिघळले आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेचा धसका शिंदे गटाने घेतल्याने आणि उद्धव ठाकरेंना वाढते जनसमर्थन मिळत असल्यानेच सत्ताधाऱ्यांनी सभा नाकारण्याचे षडयंत्र सुरू केल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. जळगाव येथील सभेलाही यामुळेच परवानगी नाकारली गेली आणि सिल्लोड येथेही परवानगी दिली गेली नाही. असा सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

जाहिरात

दरम्यान आदित्य ठाकरे जळगाव, बुलढाणा दोऱ्यावर आहेत. त्यांची संवाद यात्रा सुरू असल्याने ते विविध ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांना भेट देणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी संवाद साधणार आहेत. यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांचा चांगलाच समाचार घेतला. अब्दुल सत्तार यांंच्या वक्तव्यावर त्यांनी पलटवार करत त्यांना हिरवा साप अशी उपमा दिली आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :  मोठी बातमी, अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज? शिर्डीच्या शिबिराकडे फिरवली पाठ

यावेळी खैरै म्हणाले की, आदित्य ठाकेर जळगाव, सिल्लोड दौऱ्यावर येत आहेत. मुळात आदित्य ठाकरे हे संवाद यात्रेच्या निमीत्ताने राज्यभर दौरे करत आहेत. यामुळे त्यांची याठिकाणी सभा नसून संवाद आहे. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत, त्यामुळे त्यांच्या सभेचा विषय नाही.

जाहिरात

खैरे पुढे म्हणाले, सत्तार आता काहीही बडबड करतो फिरत आहे. त्याच तोंड बंद आम्हीच बंद करणार आहे, तो सरडा आहे, हिरवा साप आहे, तो घाबरत होता मला, आता मंत्री झालाय म्हणून उडतोय म्हणून मला त्याचा राग येत असल्याची खरमरीत टीका खैरे यांनी केली आहे.

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत बोलतांना खैरे म्हणाले की, निवडणुकीत मुस्लिम समाजाचे बोनस मते शिवसेनेला मिळतात. मुस्लिमांचे 20 टक्के मते शिवसेनेला मिळणार असून, ते आपले बोनस मत आहे. तर लवकरच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होतील आणि हे सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याचे विधान खैरे यांनी केले.

जाहिरात

 हे ही वाचा :  ‘शिंदे गटाचा उठाव झाला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत असती’; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

2024 मध्ये 400 खासदार निवडून येईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले, मात्र प्रत्यक्षात देशाचे वातावरण बदलत आहे. प्रादेशिक पक्ष जागे झाले आहेत, भाजपला इतकं यश मिळणार नसल्याचेही ते म्हणाले,  तसेच ठाकरे घराण्याला कुणीही आव्हान देऊ शकत नाही. त्यांच्या हाताखाली यांनी काम केले आहे. सत्तार हा हिरवा साप आहे तो वातावरण खराब करतोय त्याला आम्ही ठेचणार असल्याचेही खैरे म्हणाले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात