मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत, नेमकं काय घडलं?

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत, नेमकं काय घडलं?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-कर्जत दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई, 18 ऑगस्ट : मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे रात्री आठ-साडे आठ वाजेच्या सुमारास लोकल ट्रेनने भरपूर गर्दी असते. लाखो चाकरमानी लोकल ट्रेनने आपापल्या कार्यालयातून घरी जातात. त्यामुळे अशा गर्दीच्या वेळी वाहूतक कोंडी झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. गेल्या अर्ध्या तासापासून वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-कर्जत दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे. भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. सिंहगड एक्सप्रेसच्या पाठिमागे असलेल्या सर्व रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. ('गोविंदांना सरकारी नोकरी मिळणार', मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा) संबंधित घटनेमुळे डाऊन दिशेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कर्जतहुन इंजिन आल्यावर वाहतूक सुरळीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र यासाठी अजून अर्धा तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या