जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मविआचा आणखी एक निर्णय रद्द, उद्धव ठाकरेंना धक्का, उस्मानाबादकरांच्या पदरी निराशा

मविआचा आणखी एक निर्णय रद्द, उद्धव ठाकरेंना धक्का, उस्मानाबादकरांच्या पदरी निराशा

 आयुर्विज्ञान आयोगाने प्रस्ताव नाकारला असल्याने शासकीय महाविद्यालय पुन्हा एकदा रखडले आहे.

आयुर्विज्ञान आयोगाने प्रस्ताव नाकारला असल्याने शासकीय महाविद्यालय पुन्हा एकदा रखडले आहे.

आयुर्विज्ञान आयोगाने प्रस्ताव नाकारला असल्याने शासकीय महाविद्यालय पुन्हा एकदा रखडले आहे.

  • -MIN READ Osmanabad,Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

उस्मानाबाद, 04 सप्टेंबर : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर एकापाठोपाठ महाविकास आघाडीच्या (mva gavoernment) निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला. आता उस्मानाबादसाठी मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (Government Medical College) प्रस्ताव केंद्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (Central Commission for Medical Sciences) नाकारला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडी सरकारने मोठा गाजावाजा करत उस्मानाबादसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा चा प्रश्न बनवत हे महाविद्यालय उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी मंजूर केले होते. औरंगाबाद इथं झालेल्या सभेत हा प्रस्ताव कसा मंजूर केला याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांचा हवाला देत कौतुकही उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. पण आता उद्धव ठाकरे यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारच्या आयुर्विज्ञान आयोगामार्फत खो देत धक्का दिला आहे. आयुर्विज्ञान आयोगाने हा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे या वर्षी कोणतेही प्रवेश होणार नाही. आयुर्विज्ञान आयोगाने प्रस्ताव नाकारला असल्याने शासकीय महाविद्यालय पुन्हा एकदा रखडले आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रिया होणार नाहीत. (शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच, शिंदे गटाला घ्यावी लागणार माघार?) दरम्यान, राज्यात चांगल्या दर्जाचे शासकीय महाविद्यालय नसल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय उभारले जावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाला आदेश दिले होते. त्यामुळे 16 जिल्ह्यांमध्ये शासकीय रुग्णालय उभारण्यात गी मिळेल. परभणी, उस्मानाबाद, मुंबई उपनगर आणि रत्नागिरी या ठिकाणी महाविद्यालय उभारण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तर परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी या तीन ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यापैकी उस्मानाबादचा प्रस्ताव नाकारला आहे. (काँग्रेसमध्ये फूट, अशोक चव्हाणांसह 3 मंत्री आणि 9 आमदार भाजपच्या वाटेवर?) तर, मेडिकल कॉलेज याच वर्षी सुरू होईल त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल अशी माहिती, भाजपचे आमदार राणा पाटील यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात