मुंबई : SBI किंवा तुमचे या पाच बँकांमध्ये पैसे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. याचं कारण म्हणजे SBI आणि इतर पाच बँकांना एका कंपनीने कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून CBI ने कंपनीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे समजून घेऊया. रायगडमधील लोहा इस्पात लिमिटेड कंपनीसोबत सात जणांविरोधात CBI ने कठोर कारवाई केली आहे. या कंपनीने SBI सह इतर पाच बँकांना देखील 1017.93 कोटी रुपयांचा मोठा गंडा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये SBI सह बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे.
CBI NEWS : बॅगा उघडल्या तर पैसेच पैसे, अधिकाऱ्याकडे सापडली तब्बल 20 कोटींची कॅशया बँकांकडून मुदत कर्ज आणि एनएफबी मर्यादेचा लाभ घेऊन 1017.93 कोटी रुपये हडपले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं. आरोपींनी 2012 ते 2017 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या बँकांकडून 812.07 कोटींचं वर्किंग कॅपिटल, मुदत कर्ज घेतली होती. आता हे कर्ज बुडवल्याचा आरोपही केला जात आहे.
घरात नोटांचा महापूर, तब्बल 38 कोटींची रोख सापडली, CBI च्या अधिकारीही चक्रावलेSBI ने दाखल केलेल्या तक्रारीनंतर लोहा इस्पात कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश पोद्दार, संचालक संजय बन्सल, हमीदार राजेश अगरवाल, अंजू पोद्दार आणि मनीष गर्ग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. CBI ने ही कारवाई केली असून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. यामध्ये आणखी कोणाचे लागेबांधे आहेत का याचा देखील तपास सुरू आहे.