• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • MPSCसह 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठी बातमी, कॅबिनेट मंत्र्यांनी केली आग्रही मागणी

MPSCसह 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठी बातमी, कॅबिनेट मंत्र्यांनी केली आग्रही मागणी

MPSC EXAM : राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी आता 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे.

  • Share this:
मुंबई, 9 एप्रिल: देशात सध्या कोरोनाची (Coronavirus) रुग्ण संख्या वाढण्याचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात एका बाजूला रुग्णांना बेड्स मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे तर दुसरीकडे लसींचा साठाही कमी पडत आहे. यामुळेच महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात गेले तीन-चार दिवस दररोज शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या राज्यातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा (MPSC Exam) तसेच शालांत बोर्ड परीक्षा (Maharashtra Board Exam) नियोजित वेळेत घ्याव्यात की नाहीत यावरून वेगवेगळी मतमतांतरे समोर येऊ लागली आहेत. राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यांनी आता 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी (MPSC exam postponed) अशी मागणी केली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. राज्यात सध्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना वाहतुकीसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र दूर असल्यास जाणे कठीण आहे. तसंच सद्यस्थितीत रुग्णांना सेवा-सुविधा पुरवणंही हीदेखील एक मोठी समस्या झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर विद्यार्थ्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली तर त्याचा सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो, असं मत विजय वडेट्टीवार यांनी मांडलं आहे. हेही वाचा - धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण, सर्वांनी घेतली होती लस '11 एप्रिल रोजी होणारी स्पर्धा परीक्षा रद्द करावी आणि ज्यावेळेस राज्यातील रुग्ण संख्या नियंत्रणात येईल त्यावेळेस परीक्षा घ्यावी. सदर कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी देखील सरकारने खबरदारी घ्यावी,' अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षाही या महिन्यात सुरू होत आहेत. ही परीक्षा रद्द करून नवी तारीख द्यावी, अशी मागणी आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एप्रिल महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा रद्द करून नव्याने नियोजन करावं, अशी मागणी केली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागण्यांवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय काय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: