जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नगर जामखेडजवळ भीषण अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू, कुटुंबातील 3 गंभीर जखमी

नगर जामखेडजवळ भीषण अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू, कुटुंबातील 3 गंभीर जखमी

नगर जामखेडजवळ भीषण अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू

नगर जामखेडजवळ भीषण अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू

अहमदनगर जामखेडचे प्रसिद्ध भांडे दुकान व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघाती निधन झाले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जामखेड, 2 नोव्हेंबर : दिवसेंदिवस रस्ते अपघाताची संख्या वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांचा अपघातात मृत्यू झाल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. अहमदनगर जामखेडचे प्रसिद्ध भांडे दुकान व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघाती निधन झाले असून तीन गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवदर्शन आवरून परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. अहमदनगर जामखेडचे प्रसिद्ध भांडे दुकान व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्यासोबत प्रवास करणारे तीन गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देवदर्शन आवरून परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. पोखरी जवळ कार उलटल्याने हा अपघात घडला आहे. व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघातात  निधन झाले असून गाडीत आसलेल्या त्यांच्या पत्नी रेखा महेंद्र बोरा, सुन जागृती बोरा आणि नातू भुषण बोरा हे गंभीर जखमी झाले. जखमींवर जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल येथे तातडीने प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगरला आल्यात आले आहे. जामखेड येथील भांड्याचे प्रसिध्द व्यापारी महेंद्र बोरा हे आपल्या कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी राजस्थानला गेले होते. येथुन देवदर्शन करुन जामखेडकडे परत येत असताना नगर जामखेड रोडवरील पोखरी जवळ आल्यानंतर कार पुलाच्या खाली गेल्याने झाल्याने त्यांच्या कारचा भिषण अपघातात झाला. वाचा - बीड : आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य, व्ह्यू पॉईंटवरून मारली खोल दरीत उडी रस्ते अपघात कधी थांबणार? गत काही महिन्यांपासून राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही. एखाद्या अपघातात सारे कुटुंबच नाहीसे झाल्याचे दिसते तेव्हा तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त केली जाते. पण, नंतर पुन्हा तेच सुरू होते. अपघातात ज्यांचे प्राण गेले त्यांचे काय? त्यांच्या कुटुंबियांचे काय? एखादा भयानक अपघात घडला की थेट पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत शोक व्यक्त केला जातो, दोन-चार लाखांची मदत जाहीर होते. मात्र, हे अपघात कधी थांबणार? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident
  • First Published :
जाहिरात
जाहिरात