जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bus Driver Suicide : धक्कादायक! महाराष्ट्राच्या बस चालकाची गुजरातमध्ये एसटीतच आत्महत्या

Bus Driver Suicide : धक्कादायक! महाराष्ट्राच्या बस चालकाची गुजरातमध्ये एसटीतच आत्महत्या

Bus Driver Suicide : धक्कादायक! महाराष्ट्राच्या बस चालकाची गुजरातमध्ये एसटीतच आत्महत्या

धुळ्यातील बसचालकाने गुजरातमध्ये आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

  • -MIN READ Dhule,Dhule,Maharashtra
  • Last Updated :

धुळे, 13 नोव्हेंबर : धुळ्यातील एका बस चालकाने धक्कादायक पाऊल उचललल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान धुळे ते गुजरात बस चालकाने प्रवास केला गाडी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानकात लावली. अन् अचानक चालकाने थांबलेल्या बसमध्ये मध्यभागी असलेल्या नळीला दोरी बांधत गळफस घेतल्याने सगळ्यानाच धक्का बसला आहे. धुळ्यातील बसचालकाने गुजरातमध्ये आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. नवीन पाटील असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

जाहिरात

काल (दि.12) काही तासांचा प्रवास करत नवीन पाटील या बसचालकाने धुळे ते गुजरातमधील सुरत एसटी प्रवास केला. दरम्यान बस मध्यरात्री सुरतच्या उधना बस स्थानकात जाताच कोणी नसल्याचा अंदाज घेत. बसमध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान काही काळाने आत्महत्या केल्याचे समजताच बस स्थानकात एकच खळबळ उडाली होती.

हे ही वाचा :  नवी मुंबई हादरली, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू

ही घटना काल मध्यरात्रीची घडली असून आज सकाळी निदर्शनास आली आहे. या घटनेनंतर गुजरात परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सदर चालकाचा मृतदेहाचा पोस्टमार्टम करून कायदेशीर प्रक्रियेनंतर धुळ्याला पाठवण्यात येणार आहे. दरम्यान चालक पाटील यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

महाराष्ट्रात लाल परीचे चाक पुन्हा रुळावर आले असले तरी संपामुळे अनेक कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. कर्जाचे हफ्ते, आर्थिक विवंचनेत सापडल्याने नवीन पाटील यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पाचोरा-जळगाव रस्त्यावर असलेल्या बिल्दी धरणाजवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागी ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात रोहित रघुनाथ पाटील हा तरुण त्याचा मित्र दीपक गंगाराम पाटील याच्यासोबत पाचोराहून जळगावकडे दुचाकीने जात होते. रस्त्यावरील बिल्ली फाट्याजवळील धरणाजवळ येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली.

जाहिरात

हे ही वाचा :  तब्बल 24 वर्षांनी उलगडलं एका खुनाचं गूढ…पोलिसांनी हुशारीने शोधून काढला खुनी

या धडकेत दीपक गंगाराम पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला रोहित पाटील याला गंभीर दुखापत झाली. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात मयतावर शवचिच्छेदन करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात