Home /News /maharashtra /

धक्कादायक! मृतदेहांची अदलाबदल, चूक लक्षात आल्यानंतर पुरलेला मृतदेह काढला बाहेर

धक्कादायक! मृतदेहांची अदलाबदल, चूक लक्षात आल्यानंतर पुरलेला मृतदेह काढला बाहेर

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (Govt Medical College Latur) गलथान कारभारामुळे मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर शेळगाव (ता.चाकूर) येथे अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह जमिनीतून उकरून काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लातूर, 07 मे: वैद्यकीय महाविद्यालयातील (Govt Medical College Latur) गलथान कारभार लातुरमध्ये समोर आला आहे. मृतदेहांची अदलाबदल झाल्यानंतर शेळगाव (ता.चाकूर) येथे अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह जमिनीतून उकरून काढण्यात आला आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील धोंडीराम तोंडारे (वय 65) यांना मागील आठवड्यात कोरोना (Corona Infection) झाल्यामुळे त्यांच्यावर उदगीर येथे उपचार करून लातूर येथील कै. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावाकडे आणला आणि त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार केले. हे वाचा -Coronavirus Second Wave : बचावासाठी कोणता Mask वापरणं योग्य? याच दरम्यान हातोला (ता. अंबाजोगाई) येथील आबासाहेब सखाराम चव्हाण (वय 45) यांचाही मृत्यू झाला होता. वैदयकीय महाविद्यालयातील गलथान कारभारामुळे शेळगावच्या तोंडारे यांच्या नातेवाईकांकडे चव्हाण यांचा मृतदेह देण्यात आला, मृतदेहाची खात्री कोणीही केली नाही आणि त्याच्यावर अंत्यंसस्कार करण्यात आले. सकाळी चव्हाण यांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली आणि मृतदेहाची अदला-बदल झाल्याचे लक्ष्यात आले. हे वाचा - Smell आणि Taste जाणं चांगलं लक्षण; कोरोना रुग्णांसाठी पॉझिटिव्ह बातमी यानंतर नातेवाईकांनी तोंडार यांचा मृतदेहसोबत घेऊन शेळगाव येथे आले व त्यांनी तोंडारे यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून चव्हाण यांचा पुरलेला मृतदेह काढून घेतला आणि गावाकडे घेऊन गेले. यानंतर तोंडारे यांच्या मृतदेहावर अत्यंसंस्कार केले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर लातूर महानगरपालिकेकडून अंत्यसंस्कार केले जात असतानाही अनेक मृतदेह स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता गावाकडे अंत्यविधीसाठी आणले जात आहेत. महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या नंतर महाविद्यालयाकडून एक परिपत्रक काढत कुटुंबीयांच्या चुकीमुळे मृतदेहांची अदलाबदल होण्याचा हा दुर्देवी प्रकार  घडल्याचे जाहीर केले आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळं हा प्रकार समोर आलाय.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Corona updates, Coronavirus, लातूर

पुढील बातम्या