बुलढाणा, 27 ऑक्टोबर : बुलढाणा जिल्ह्यात एका फायनान्स कंपनीकडून कर्जदाराला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कर्जाचा हप्ते चुकल्याच्या कारणावरून कायदा हातात घेत अतिषय अमानुष मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने फायनान्स कंपन्यांवर कोणाचाच अंकूश नसल्याचे दिसून येत आहे. फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून तीन दिवस डांबून ठेवत एका कर्जदारावर अमानुष अत्याचार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून तीन दिवस डांबून ठेवत एका कर्जदारावर अमानुष अत्याचार केला. एवढेच नाही तर जळत्या सिगरेटचे चटके सुद्धा फिर्यादीला देण्यात आले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव मध्ये अशपाक खान नामक 32 वर्षीय युवकाने बोलेरो वाहनावर कर्ज घेतले होते, मात्र व्यवसाय मंदीत आल्यामुळे या युवकाने हे वाहन अकोला येथील एकास रीतसर नोटरी करून विक्री केली होती.
हे ही वाचा : महिलेसोबत बसमध्येच घडला धक्कादायक प्रकार, स्थानकाऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली बस
मात्र सदर खरेदीदाराने या कर्ज देणाऱ्या कॅपिटल फायनान्स चे हप्ते न भरल्यामुळे सदर फायनान्सच्या वसुली करणाऱ्या काही लोकांनी अशपाक खान यास शेगावातून उचलून खामगाव शहरातील एका खोलीत नेऊन तब्बल तीन दिवस मारहाण करत अमानुष छळ केला आहे. त्यामुळे खाजगी फायनान्स करणाऱ्या कंपन्यां वसुलीसाठी कोणत्या पातळीवर आल्या आहेत हे केवळ सांगायला नको. या प्रकरणी अशपाक खान याच्या फिर्यादीवरून शेगाव पोलिसांत 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये खुनाची मालिका सुरूच
औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. दिवाळीच्या पहाटेलाच औरंगाबाद हादरले होते. सुरक्षा रक्षकाला ठार करत जबरी चोरी केली घटना ताजी असतानाच औरंगाबादमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
हे ही वाचा : खोटी मृत्यू प्रमाणपत्रं अन् गोशाळेतील जनावरांची विक्री; भंडाऱ्यातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
औरंगाबाद शहरातील मिटमिटा परिसरातील रेल्वे पटरीच्या बाजूने लाकडाच्या दांडुक्याने आणि दगडाने ठेचून अज्ञात व्यक्तीचा खून झाला. अजून पर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मृत व्यक्ती अंदाजे 35 ते 40 वयोगतील आहे. तसेच मित्र किंवा जवळच्या व्यक्तीने मारल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एकाच रात्रीमध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन खून झाल्याने औरंगाबाद हादरले आहे.