मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हृदयद्रावक ! आठवड्याभरापूर्वी भावाचं हृदयविकाराने निधन अन् आज बैलाचा पिता-पुत्रावर हल्ला, वडिलांचा जागीच मृत्यू

हृदयद्रावक ! आठवड्याभरापूर्वी भावाचं हृदयविकाराने निधन अन् आज बैलाचा पिता-पुत्रावर हल्ला, वडिलांचा जागीच मृत्यू

हृदयद्रावक ! आठवड्याभरापूर्वी भावाचं हृदयविकाराने निधन अन् आज बैलाचा पिता-पुत्रावर हल्ला, वडिलांचा जागीच मृत्यू

हृदयद्रावक ! आठवड्याभरापूर्वी भावाचं हृदयविकाराने निधन अन् आज बैलाचा पिता-पुत्रावर हल्ला, वडिलांचा जागीच मृत्यू

Bull attack on father and son in Sindhudurg Rangala Tulsuli: सिंधुदुर्गात बैलाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

भारत केसरकर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 28 ऑक्टोबर : पाळीव बैलाने पिता-पुत्रावर हल्ला (bull attacks on father and son) केल्याची घटना समोर आली आहे. बैलाने केलेल्या या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सिंधुदुर्गातील (Sindhudurg) रांगणा-तुळसुली (Rangana Tulsuli) येथे ही घटना घडली आहे. आपल्या मालकीच्या पाळीव बैलाला पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले असता बैलाने अचानक या पितापुत्रांवर हल्ला केला. यात वडील विलास शेट्ये यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर मुलगा प्रमोद शेट्ये (28) यास गंभीर दुखापत झाली आहे. प्रमोद शेट्ये याला कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आठवड्याभरापूर्वीच विलास शेट्ये यांच्या मोठ्या भावाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं होतं. आठवड्याभरात एकाच कुटुंबात झालेल्या दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे शेट्ये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विलास शेट्ये हे सकाळच्या सुमारास आपल्या बैलाला घेऊन पाणी पिण्यासाठी आणि त्याला आंघोळ घालण्यासाठी नेत होते. यावेळी त्यांचा मुलगा प्रमोद हा सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होता. यावेळी बैलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. बैलाने इतक्या जोरात धडक दिली की, विलास शेट्ये हे जमीनीवर जोरात आपटले. बैलाने केलेल्या हल्ल्यात विलास यांच्या छातीला, हाताला आणि चेहऱ्यावर गंभीर जखम झाली होती. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बैलाने हल्ला केल्यावर विलास शेट्ये हे खाली पाण्यात कोसळले आणि त्यांच्या आसपास तब्बल दोन तास हा बैल उभा होता. त्यामुळे दोन तास विलास शेट्ये हे चिखलातच पडून होते.

सिंधुदुर्गात बिबट्याची दहशत; थरकाप उडवणारा LIVE VIDEO

सिंधुदुर्गातील मालवण विरण बाजार येथे मंगळवारी मध्यरात्री विजय बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात येऊन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. विरण बाजार परीसरात भरवस्थीत बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीवर हल्ला

हडपसरच्या गोसाई वस्तीत एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने घबराट पसरलीय. संभाजी बबन हाटोळे हे बिबट्याच्या हल्ल्ह्यात जखमी झालेत. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी ते मॉर्निग वॉकला गेले असताना बिबट्याने त्यांच्यावर पंजा मारून हल्ला केला. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला जेरबंद केलं आहे.

हडपसरमधील गोसावी वस्तीत शिरलेल्या बिबट्याचा ठिकाणा रात्री आठच्या सुमारास लागला. दोन घरांच्या बोळीत हा बिबट्या लपून बसला होता. वनविभागाच्या रेस्क्यू टिमने डॉट मारून बिबट्याला पकडले. तासाभराच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद केलं.

First published:

Tags: Bull attack, Sindhudurg