मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पती आणि सासरच्यांनी विवाहितेला पाजले विष; कारण ऐकताच बसेल आश्चर्याचा धक्का

पती आणि सासरच्यांनी विवाहितेला पाजले विष; कारण ऐकताच बसेल आश्चर्याचा धक्का

Crime news: पती आणि सासरच्यांनी मिळूनच एका विवाहितेला जबरदस्ती विषारी औषध पाजण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  राहुल खंदारे, प्रतिनिधी

  बुलडाणा, 7 जुलै : एका इसमाने आपल्या पत्नीला जबरदस्ती विषारी औषध पाजून (Man poisoned wife) तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आरोपीला (Accused) त्याच्या कुटुंबीयांनीही मदत केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

  विवाहितेचा विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेत विवाहिता ही गंभीर झाली असून तिला उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथे राहणाऱ्या युनूस खान याने आपल्या पत्नीला न सांगता दुसरा विवाह केला. ही माहिती पहिल्या पत्नीला कळली. त्यानंतर पहिल्या पत्नीने युनूस खान याला हटकले आणि सांगितले त्या महिलेसोबत राहू नका. यावरुन दोन्ही पती आणि पत्नीमध्ये जोरदार वाद झाला.

  तुमची मुलं Online Game खेळतात? नागपुरात अल्पवयीन मुलीला बसला फटका, अश्लील Video Viral

  हा वाद इतका टोकाला पोहोचला की, संतप्त झालेल्या युनूस याने आपल्या पत्नीला विषारी औषध पाजले. या प्रकरणात केवळ युनूस सहभागी नव्हता तर त्यामध्ये सासरच्या मंडळींचा सहभाग होता. विष पाजल्याने पीडित महिलेची प्रकृती बिघडली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या पीडितेने आपल्या जबाबात संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला आहे. पीडित महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारे आता पोलिसांनी पीडित महिलेचा पती युनूस खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

  First published:
  top videos

   Tags: Buldhana news, Crime