मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ओव्हरटेकच्या प्रयत्नात कंटेनरला धडकली कार, भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू

ओव्हरटेकच्या प्रयत्नात कंटेनरला धडकली कार, भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू

 अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

बुलडाणा, 2 ऑगस्ट : खामगांव अकोला रोडवरील पिंप्राळा फाट्यावर कंटेनर व कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

खामगाव अकोला महामार्गावरील पिंप्राळा फाट्यावर आज सायंकाळी 5 च्या सुमारास कार क्र एम एच ए आर 3632 हे अकोल्याकडून खामगांव इथं येत असताना समोरून येणाऱ्या कंटेनर क्र आर जे 18 जी बी 2559 ने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील करवाई सुरू आहे.

मृतकांमध्ये अकोल्यातील शिवनगर भागातील विनोद शंकरराव बावणे वय-50, पप्पू मनोहर जोशी वय-45, अतुल शंकरराव व्यवहारे वय-47, राहुल सातळे-40 यांचा समावेश आहे. तर अनिल मावळे नामक व्यक्ती गंभीर जखमी आहे. उपचारासाठी त्यांना खामगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा - आधी एकतर्फी प्रेमातून 29 वर्षीय विवाहित महिलेला संपवलं, आता रुग्णालयात स्वत:ही सोडला जीव

अपघातग्रस्त कारचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शियांनी सांगितले. अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेह गॅसकटरच्या साह्याने पत्रे कापून बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेकॉ. खर्चे, जावेद शेख, गवई, खोले यांनी घटनास्थळावर धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

First published: