पिंपरी चिंचवड, 2 ऑगस्ट : एकतर्फी प्रेमाची नशा डोक्यात गेल्यानंतर काय होऊ शकतं, हे दाखवणारी भीषण घटना शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये घडली. एका तरुणाने भर रस्त्यात 29 वर्षीय विवाहित महिलेचा खून केला. तसंच स्वत:वरही सपासप वार केले. एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर चाकूने वार करून खून केल्यानंतर स्वतःवरही वार केलेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच आज त्याचा मृत्यू झाला आहे.
तरुणाने महिलेचा चाकूने वार करून खून केल्याची घटना पिंपरी चिंचवड परिसरातील अजंठानगर, येथे घडली शनिवारी घडली होती. तरुणाच्या हल्ल्यात राणी लांडगे नामक 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिच्यावर वार करणारा अरविंद गाडे (वय 30) व्यक्ती जखमी झाला होता. मात्र आता त्याचाही मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मयत महिला राणी आणि आरोपी अरविंद हे शेजारी राहत होते. दरम्यान, त्यांच्यात ओळख झाली. अरविंद हा राणी यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. याबाबत राणी यांचे पती सतीश यांनी त्याला समजावून सांगितले होते. अरविंद वारंवार फोन करीत असल्याने राणी यांनी मोबाईल क्रमांक बदलला होता. त्यामुळे चिडलेल्या अरविंद याने शनिवारी राणी यांच्यावर हल्ला केला.
राणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अरविंद याने स्वतःवरही वार करून घेतले. त्याच्यावर पिंपरीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज त्याने प्राण सोडले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.