थरारक VIDEO : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली 3 मजली इमारत, कुटुंब थोडक्यात बचावलं!

थरारक VIDEO : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली 3 मजली इमारत, कुटुंब थोडक्यात बचावलं!

इमारत कोसळताच मोठा आवाज झाल्याने परीसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

  • Share this:

बुलडाणा, 5 जुलै : बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गांधी चौकातील मूख्य मार्गावरील नवगजे यांची तीन मजली इमारत दिनांक 4 जुलै रोजी सायंकाळी कोसळली. इमारत कोसळण्याआधी या इमारतीत राहणाऱ्या आशीष नवगजे यांच्या कुटुंबास बाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

इमारतीखाली किराणा दुकानचे पूर्ण साहित्य व नवगजे यांच्या घरातील साहित्य दबल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इमारत कोसळताच मोठा आवाज झाल्याने परीसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

हेही वाचा - SPECIAL REPORT : शिवसेनेच्या नगरसेवकांनी का केला राष्ट्रवादीत प्रवेश? हे आहे कारण

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच ठाणेदार अनिल पाटील, तहसीलदार राहूल तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचंही स्पष्ट झालं.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: July 5, 2020, 8:37 AM IST

ताज्या बातम्या