मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अजब खुन्नस! घराकडे पाहून केली शिवीगाळ; जाब विचारल्यानं कुटुंबाला चाकू अन् बेल्टनं मारहाण

अजब खुन्नस! घराकडे पाहून केली शिवीगाळ; जाब विचारल्यानं कुटुंबाला चाकू अन् बेल्टनं मारहाण

Crime in Latur: घराकडे पाहून शिवीगाळ करणाऱ्या (Abused looking at home) व्यक्तीला जाब विचारल्यानं एका कुटुंबाला मारहाण (Family beaten by 4 men) केली आहे.

रेणापूर, 06 जुलै: घराकडे पाहून शिवीगाळ करणाऱ्या (Abused looking at home) व्यक्तीला जाब विचारल्यानं एका कुटुंबाला मारहाण (Family beaten by 4 men) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. कोणतही कारण नसताना आरोपी व्यक्ती फिर्यादीच्या घराकडे  पाहून शिवीगाळ करत होता. फिर्यादी व्यक्तीनं घराकडे पाहून शिव्या देऊ नको, असं म्हटल्यानं आरोपीनं फिर्यादीला चाकू (Knife) आणि बेल्टनं बेदम मारहाण (Beating) केली आहे. शिवाय जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटेनचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथील आहे. आरोपीनं फिर्यादीच्या घराकडे पाहून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला आणि घरातील अन्य सदस्यांना चाकू आणि बेल्टनं मारहाण केली आहे. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात ज्ञानोबा रामकिशन आलापूरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत.

हेही वाचा-अर्ध्यावर मोडला संसार; वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

फिर्यादी ज्ञानोबा रामकिशन आलापूरे यांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, आरोपी विष्णू शिवाजी मामडगे आणि अन्य तिघे आलापूरे यांच्या घराकडे पाहून शिव्या देत जात होते. दरम्यान आलापूरे यांनी घराकडे पाहून शिवीगाळ का करत आहात? असा जाब विचारला. यानंतर विष्णू शिवाजी मामडगे यानं जवळ बाळगलेल्या चाकूनं फिर्यादीच्या हातावर वार केला. त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ जखम झाली आहे.

हेही वाचा-मध्यरात्री अंगावर पेट्रोल टाकून सासूला पेटवलं; पोलीस हवालदार सुनेचा प्रताप

या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. फिर्यादीच्या घरातले आणि आसपासचे शेजारी एकत्र जमा झाले. दरम्यान बाचाबाची झाल्यानंतर आरोपीसोबत असणाऱ्या अन्य तिघांनी फिर्यादीची पत्नी, आई आणि शेजारच्या व्यक्तींनाही शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर विष्णू येमले नावाच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाला बेल्टनं आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यातील एकानं फिर्यादीच्या मोटारसायकलवर दगड मारून दुचाकीचं नुकसान केलं. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Beating retreat, Crime news, Latur