नागपूर, 19 ऑक्टोबर : मोठा गाजावाजा करून नागपूरची मेट्रो (nagpur metro) सुरू झाली. मेट्रोचे काम अजूनही सुरू आहे. मात्र पारडी भागात उड्डाणपुलाचा (bridge collapses) काही भोग कोसळल्याची घटना घडली आहे. पुलाचा भलामोठा भाग हा रस्त्यावर आदळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पारडी भागात ही घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे. पुलाचा मोठा भाग हा जमिनीवर कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे नेमक काय घडलं कुणालाही कळलं नाही. लोकांनी जेव्हा घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पुलाचा भाग कोसळलेला असल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानाने धाव घेतली आहे. अचानक पुलाचा एवढा मोठा भाग कसा काय कोसळला असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. सुदैवाने या मार्गावर गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.
घटनास्थळावर प्रशासकीय अधिकारी पोहोचले असून कोसळलेला पुलाचा भाग बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बघ्याच्या गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.