Home /News /maharashtra /

BREAKING: सिंधुदुर्गात मोठी दुर्घटना; पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली जवळ बुडाली

BREAKING: सिंधुदुर्गात मोठी दुर्घटना; पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली जवळ बुडाली

सिंधुदुर्गातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पर्यटकांनी भरलेली एक बोट बुडाली असल्याचं वृत्त आहे.

    भारत केसरकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 24 मे : सिंधुदुर्गात मालवणजवळ एक बोट बुडाली (boat capsized near Malvan) असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालवणमधील तारकर्ली (Tarkarli Malvan) येथे ही दुर्घटना घडली आहे. या बोटीवर एकूण 20 पर्यटक उपस्थित होते अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. बोट बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आलं आहे. 'जय गजानन' नावाची ही बोट बुडाली आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्याचा पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. पर्यटकांची मोठी पसंती ही मालवणसह तारकर्लीला असते. तारकर्ली हे पर्यटनाचे माहेरघर मानले जाते. पुणे आणि मुंबईतून एक ग्रुप पर्यटनासाठी तारकर्लीमध्ये आला होता. हे सगळेच 20 जण पर्यटक स्कुबा डायविंगसाठी समुद्रात गेले होते. स्कुबा डायविंग आटपून हे पर्यटक तारकर्ली समुद्र किनाऱ्याच्या दिशेने परतत होते. दरम्यान आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने ही स्कुबा डायविंगची बोट समुद्रात पलटी झाली आणि या मधील सर्व 20 पर्यटक समुद्राच्या पाण्यात कोसळले. वाचा : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर बुडणाऱ्या पर्यटकांना सुदैवाने समुद्रकिनारे आणण्यात यश आले. मात्र यातील दोन जणांचा बुडून अंत झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. इतरांना जणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान दोघांचे निधन झाले आहे तर दोघे जण अतिशय गंभीर स्थितीमध्ये आहेत. या उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. खरं तर पावसाळा जवळ आल्याने स्कुबा डायविंग हे शासनाने बंद केले होते. पण स्थानिक व्यावसायिकाने स्वतःच्या ताकतीवर हा निर्णय घेऊन आजपासूनच ते सुरू केले होते. याचा मोठा फटका बसला असून पोलीस यंत्रणा याची कसून चौकशी करत आहे. 16 जणांची प्रकृती स्थिर आहे. दुर्घटना झालेल्या बोटमध्ये नेमके किती प्रवासी होते? बोटमध्ये किती प्रवाशांना नेण्याची परवानगी होती? ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटमध्ये होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दिल्लीतील इंजिनिअरचा लोणावळ्यातील जंगलात मृतदेह आढळला दिल्लीतील एक अभियंता शुक्रवारी (20 मे 2022) लोणावळ्याच्या जंगलात हरवला होता. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. फरहान शहा असं त्याचं नाव आहे. त्याच्या शोधासाठी एनडीआरएफ, लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव सरंक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक कार्यरत होते. आज शोधमोहिमे दरम्यान फरहान शहा याचा मृतदेह आढळून आला आहे. लोणावळा आणि खंडाळाच्या घनदाट झाडीत हरविलेल्या अभियंत्याचा शोध घेण्यासाठी NDRF चं पथक पोहचलेलं. तत्पूर्वीच आज सकाळी आयएनएस शिवाजीच्या जवानांना दरीतून दुर्गंधीचा वास आला होता. त्याच दिशेने NDRF चे जवान दरीत उतरले. तिथं फरहाणच्या टी शर्ट आढळला. फरहान याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. फरहानच्या शोधासाठी आज श्वान पथक ही दाखल झालं होतं.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra News, Sindhudurg

    पुढील बातम्या