मुंबई, 19 ऑक्टोबर : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस कंट्रोल रुममध्ये काल रात्री 10 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. तसेच मुंबईत 3 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती या फोन कॉलवरुन देण्यात आली आहे. या फोन कॉलनंतर एकच खळबळ उडाली आहे.
112 या हेल्पलाईनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस घेत आहेत. अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहूचं PVR मॉल आणि डोमेस्टिक विमानतळाजवळील सहारा हॉटेलवर बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा एका कॉलरने केला आहे.
दरम्यान, या फोन कॉलनंतर सहार विमानतळ पोलीस जुहू, आंबोली आणि बांगूर नगर पोलिस स्टेशन आणि सीआयएसएफ आणि बीडीडीएसच्या पथकाने तपास सुरू केला आहे. पोलिसांनी तासनतास त्या ठिकाणांची तपासणी केली. मात्र, पोलिसांना कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडली नाही. तर यानंतर मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे.
हेही वाचा - ठाकरेंवर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप, हायकोर्टात याचिका, आदित्य म्हणतात, प्रॉपर्टी बघायची असेल तर...
दरम्यान, अलीकडच्या काळात मुंबई पोलिसांना असे अनेक धमकीचे फोन येत आहेत, जे तपासात पूर्णपणे खोटे असल्याचे समोर आले आहे. तरीही पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये कोणताही निष्काळजीपणा पत्करावा असे वाटत नाही. मुंबई पोलीस सध्या या धमकीच्या फोन कॉलरची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून या संपूर्ण प्रकरणाची वास्तविकता कळू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, Mumbai