जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजप महिला खासदाराच्या कारला अपघात; खासगी रुग्णालयात केलं दाखल

भाजप महिला खासदाराच्या कारला अपघात; खासगी रुग्णालयात केलं दाखल

भाजप महिला खासदाराच्या कारला अपघात; खासगी रुग्णालयात केलं दाखल

कार वाहन दुभाजकाला धडकल्याने त्यांच्यासह दुचाकीस्वार महिलेसह 3 जणं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नंदुरबार, 7 ऑगस्ट : भाजप खासदार डॉ. हीना गावित यांच्या कारचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. रविवारी दुपारी नंदुरबारात ही घटना घडली. खासदार गावित यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हीना गावित यांची कार वाहन दुभाजकाला धडकल्याने त्यांच्यासह दुचाकीस्वार महिलेसह 3 जणं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार हीना गावित या आपल्या कारने रविवारी दुपारच्या वेळेस नंदुरबार येथील एका कार्यक्रमाला जात होत्या. करण चौफुली जवळील देवचंदनगर जवळील रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या कारसमोर दुचाकीस्वार महिला आली. कारचालकाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असताना कार दुभाजकाला आदळली. यात हीना गावित यांना हाताला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. यात दुचाकीस्वार महिलाही जखमी झाली आहे. खासदारासह दुचाकीस्वार महिलेलाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात