आग्रा, 5 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याने थरकाप उडवणारं कृत्य केलं आहे. त्याने आपल्याच मित्राच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली. यानंतर मित्राचं शिर धडापासून वेगळं केलं. धड फेकून शिर ठिकाण्यावर लावण्यासाठी इकडे तिकडे फिरत राहिला. यादरम्यान
पोलिसांनी
त्याला ताब्यात घेतलं आहे. या हत्याकांडात त्याचा एक मित्रदेखील सामील होतं. पोलिसांनी हत्या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. पोलीस सध्या हत्येमागील कारणाचा शोध घेत आहे. आरोपी आणि मृतक दोघेही भाजप कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना सिंकदरा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडे तीन वाजता पोलीस गश्तीवर होते. त्यावेळी जंगलात त्यांना एक कार दिसली. यात एक तरुण कारच्या बाहेर उभा होता. जेव्हा पोलीस कारजवळ पोहोचले तेव्हा तिथं तरुणाचं शिर पडलेलं होतं. कारमध्ये दुसरा एक तरुण बसला होता. मागच्या सीटवर पाहिलं तर पोलीस हैराण झाले. सीटवर एका व्यक्तीचं शिर पडलं होतं. पोलिसांनी दोन्ही
आरोपींना अटक
केली आहे. चौकशीनुसार, मृतक चांदी व्यावसायिक नितीन वर्मा आहे. त्याचा भाऊ प्रवीण आणि अन्य जणांनी मृतकची ओळख पटवली आहे. तो गुरुवारी सायंकाळी बेलनगंजमध्ये राहणाऱ्या टिंकू भार्गवसोबत आला होता. मात्र यानंतर तो परतलाच नाही. पोलिसांनी सांगितलं की, लोहामंडी तरकारी भागात राहणारा चांदी व्यापारी नितीन वर्माच्या घराबाहेरील भागात त्यांचं दुकान आहे. नितीन वर्ना भाजप गोपेश्वर मंडलमध्ये उपाध्यक्ष होते. नितीनच्या पत्नीने सांगितलं की, सायंकाळी त्यांना फोन केला तर ते बेलनगंज येथे राहणाऱ्या टिंकूसोबत होते. काही वेळात घरी येत असल्याचं सांगितलं, मात्र रात्र झाली तरी ते घरी आले नाही. पुन्हा फोन केला तर फोन बंद येत होता. टिंकू भाजप अनुसूचित मोर्चामध्ये जिलाध्यक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.