राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) मतमोजणी सुरू आहे. त्यात उस्मानाबाद शहराचं नाव 'धाराशिव' करण्याचा वाद चिघळला आहे. शहरभर बॅनर लावून भाजपनं शिवसेनेला डिवचलं आहे.
'नमस्ते धाराशिव' असं बॅनर लावून भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नगरपालिकेला जे पत्र आलं आहे, ते सार्वजनिक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय युवा मोर्चानं दिला आहे.
'धाराशिव' हा शिवसेनेचाचा मुद्दा मागील 5 वर्षांत सरकार असताना नाव बदल्याण्याचे शहाणपण का सुचले नाही? असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपला केला आहे.