नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: सध्या भारतीय जनता पक्षात (Bharatiya janata party) प्रदेशाध्यक्ष पदावरुन लॉबिंग सुरु झाल्याचं दिसतंय. भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची गच्छंती करून त्या जागेवर आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी भाजपचा एक गट लॉबिंग करत आहे. या लॉबिंगचा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. चंद्रकांत पाटील सध्या दिल्लीत आहेत. कालपासून त्यांचा चार दिवसांचा दिल्ली दौरा सुरु झाला आहे. याच दरम्यान आपली गच्छंती होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटील देखील लॉबिंग करत आहे. अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचे संबंध बघता आपल्या संबंधाचा फायदा घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील लॉबिंग करत आहे. मात्र आगामी काही दिवसात प्रदेशाध्यक्ष पदाचा वाद निकाली काढण्यासाठी सर्व ते प्रयत्न भाजप हायकमांड करत आहे. ‘जास्त चौकशी करू नका..’ शिवसेना महिला सभापतींना धमकीचे पत्र, महापालिकेत खळबळ भाजप प्रदेशाध्यक्षांच्या शर्यतीत भाजप आमदार आशिष शेलार यांचं नाव आहे. दुसरीकडे आशिष शेलार हे मुंबईचे आहेत. महाराष्ट्राचा अध्यक्ष हा साधारणतः ग्रामीण भागातील असतो. भाजपमध्ये अध्यक्ष बदलण्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया अजून सुरू झाली नाही असे पक्षातील सूत्र सांगतात. दरम्यान सुधीर मुनगंटीवार हे यापूर्वी दोनदा प्रदेशाध्यक्ष राहिले आहे. त्यांच्या नावाची चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.