जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ''संजय राऊतांना आवारा, चौकशी होणार असल्यामुळे सैरभैर झालेत'': चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

''संजय राऊतांना आवारा, चौकशी होणार असल्यामुळे सैरभैर झालेत'': चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

  भक्तांची फौज, त्यात पुन्हा अंधभक्तांचा प्रखर उपगट आहे, तर दुसऱ्या बाजूला इतरांचे चमचे महामंडळ. हे दोघेही देशासाठी खतरनाक आहेत.

भक्तांची फौज, त्यात पुन्हा अंधभक्तांचा प्रखर उपगट आहे, तर दुसऱ्या बाजूला इतरांचे चमचे महामंडळ. हे दोघेही देशासाठी खतरनाक आहेत.

शिवसेना खासदार (Shiv Sena MP) संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपसाठी आक्षेपार्ह शब्दांचा (offensive language) वापर केला आहे. यावर भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी: शिवसेना खासदार (Shiv Sena MP) संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपसाठी आक्षेपार्ह शब्दांचा (offensive language) वापर केला आहे. यावर भाजपची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP state president) चंद्रकांत पाटील यांनी त्याच भाषेचा वापर करुन संजय राऊतांना उत्तर दिलं आहे. संजय राऊतांना आता चौकशी होणार कळल्यामुळे ते सैरभैर झालेत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली असून संजय राऊत यांना आवरा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.हे बोलताना चंद्रकांत पाटील यांनीही त्याच आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. काय म्हणाले संजय राऊत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrashekhar Rao) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेणार आहेत. या भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय. हे लोक चु# आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात अशा चु# लोकांना स्थान उरणार नाही, अशी जळजळीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. किरीट सोमय्यांनी सवाल उपस्थित केला होता की, केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोनिया गांधींकडून परवानगी घेण्यात आली का? IND vs WI 3rd T20: विराट-पंत टीम इंडियाच्या बाहेर, पाहा शेवटच्या मॅचमध्ये कशी असेल Playing 11 त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं की, असं कोण म्हणालं? देशात असे चु## लोक खूप आहेत. अशा लोकांना प्रश्न विचारणं शोभत नाही. राजकारण देशातील अशा चु## लोकांना 2024 नंतर संपवून टाकेल. 2024 नंतर देशातील राजकारण अत्यंत पारदर्शक असेल. 10 मार्चनंतर आपल्याला हे समजून येईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायला येत असेल तर त्यांचा अशाप्रकारे अपमान करणं हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. अशा चु## लोकांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते.,

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात