मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BJP State President : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईचा अध्यक्ष बदलण्याच्या तयारीत दोघेही फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय

BJP State President : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईचा अध्यक्ष बदलण्याच्या तयारीत दोघेही फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये पक्षांर्तगत पदाधिकारी बदलांच्या हालचालींना वेग आला आहे. (BJP State President) भाजपमध्ये राज्यातील विविध पदांच्या बदल्या होण्याची शक्यता आहेत.

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 12 ऑगस्ट : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमध्ये पक्षांर्तगत पदाधिकारी बदलांच्या हालचालींना वेग आला आहे. (BJP State President) भाजपमध्ये राज्यातील विविध पदांच्या बदल्या होण्याची शक्यता आहेत. दरम्यान मुंबई अध्यक्षपदासाठी माळ पुन्हा आशिष शेलार यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती आहे तर प्रदेशाध्यक्ष पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती भाजपमधील अधिकृत सुत्रांकडून देण्यात आली आहे.

याचबरोबर दोन्ही पदांसाठी लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचीही माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आशिष शेलार यांना पसंती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी आशिष शेलार हे आक्रमक असल्याने त्यांचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी ओबीसी चेहरा देणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्रीपद येणार असल्याने त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष दुसऱ्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा यापूर्वीही होती.

हे ही वाचा : आज निवडणुका झाल्या तर निकाल काय? धक्कादायक सर्व्हे वाढवणार फडणवीस-शिंदेंचं टेन्शन

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप राज्यातील महत्वाच्या पदांची नवीन नियुक्ता करणार असल्याचे बोलले जात आहे. आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्षपदाची धुरा दिल्यास त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार नसल्याचे दिसत आहे तर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यामुळे त्यांचीही मंत्रींमडळात वर्णी लागेल कि नाही यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाविकास आघाडीमध्ये मोठी चलबिचलता?

राज्यातील सत्तातरानंतर हळूहळू महाविकास आघाडीतील नाराजीही समोर येत गेली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीची चव्हाट्यावर आली. अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याने जयंत पाटील नाराज होते. यानंतर आता या प्रकरणात थेट शरद पवार यांनाच मध्यस्थी करावी लागली.

हे ही वाचा : महाविकास आघाडीत होणार मोठा वाद? कोणी नाराज तर कोणी आक्रमक, नेमकं चाललंय काय?

जयंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. यासाठी गुरुवारी सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी शरद पवार यांनी केली अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मध्यस्थी केल्याचं समोर येत आहे.

First published:

Tags: Ashish shelar, BJP, Chandrakant patil, Devendra Fadnavis, Mumbai

पुढील बातम्या