Home /News /maharashtra /

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न, भाजप खासदार भडकले, शिवसैनिकांना दिला इशारा

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या घर-कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न, भाजप खासदार भडकले, शिवसैनिकांना दिला इशारा

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसैनिकांना इशारा दिला. बंडखोर आमदार कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत नाही, असा इशारा देत चिखलीकर यांनी आमदारांच्या सुरक्षेची हमी दिली.

नांदेड, 25 जून : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिल्याने नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी आज कल्याणकर यांच्या घर आणि कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्ती केल्याने संबंधित प्रकरण निवळलं. पण कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली होती. संबंधित घटनेवर भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी शिवसैनिकांना इशारा दिला. बंडखोर आमदार कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत नाही, असा इशारा देत चिखलीकर यांनी आमदारांच्या सुरक्षेची हमी दिली. शिवसेनेचे नांदेडचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्याल आणि घरावर शिवसैनिकांनी आज हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. मालेगाव रोडवर आमदार कल्याणकर यांचे कार्यालय आणि कार्यालयावर निवावसास्थान आहे. (लता मंगेशकरांविषयी बोलणार नाही, शास्त्रीय संगीताविषयीही...; दीदींच्या भाचीच्या वक्तव्यामुळे चाहते नाराज) शिवसैनिक दुपारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर थेट आमदार कल्याणकर यांच्या घरावर धडकले. काही शिवसैनिकांनी आमदार कल्याणकर यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार धक्काबुक्की, रेटारेटी झाली. परिस्थती चिघळण्याची अवस्थेत होती. मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या गोंधळामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. संबंधित घटनेवरवर भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसैनिकांना इशारा दिला. बालाजी कल्याणकर हे शिंदे गटासोबत सामील झाले आहेत. कल्याणकर हे सेना भाजपचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी भाजपनेही मेहनत घेतली. हिंदुत्वाच्या मुद्यावर ते शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे कल्याणकर यांच्या केसाला धक्का लागणार नाही याची हमी खासदार चिखलीकर यांनी दिली.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: BJP, Shiv sena

पुढील बातम्या