सातारा, 14 ऑक्टोबर: भाजपचे राज्यसभा (BJP MP) खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) नेहमी आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यातच त्यांच्या गाड्यांच्या कलेक्शनचे बरेच चाहते आहेत. आता त्यांच्या ताफ्यात नुकतीच बीएमडब्ल्यू (BMW) कारची भर पडली आहे. त्यांनी पुण्यातून (Pune) बीएमडब्ल्यू गाडी विकत घेतली.
पुण्यातील बवेरीयन मोटर्स प्रा. ली. येथीन त्यांनी बीएमडब्लू या कंपनीची TEX 5 ही गाडी विकत घेतली. उदयनराजे भोसले यांच्या गाडीचा नंबरही 007 असा आहे. नव्या बीएमडब्लू कारला MH 11 D D 007 हाच नंबर घेतला आहे.
View this post on Instagram
बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये आहे. त्यांनी नव्या कारसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करताच हा फोटो भलताच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा- IPL 2021: विजयाच्या जवळ येऊनही ‘दिल्ली’ दूरच, मॅच हरताच पंत, पृथ्वीचे अश्रू अनावर VIDEO
अनेक वेळा स्वतः उदयनराजेंचे गाडी चालवतानाचे किंवा रायडिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आतापर्यंत उदयनराजे यांच्या ताफ्यात ऑडी, मर्सिडिज बेंज, एंडेव्हर, मारुती जिप्सी या चार आलिशान कार होत्या. त्यात आता बीएमडब्लूची भर पडली आहे. त्यांच्या पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे पोलो ही कार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Udyanraje Bhosle