'शिवाजी महाराजांसोबत तुलना करा, असं मोदींनी सांगितलं नसेल'

'शिवाजी महाराजांसोबत तुलना करा, असं मोदींनी सांगितलं नसेल'

वादाबद्दल छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

किरण मोहिते, सातारा, 13 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन भाजप कार्यालयात झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्ती केली. त्यानंतर याबाबत आता छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तीची तुलना आपल्या कुणाशीही करता येणार नाही,' अशा शब्दांमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच हे पुस्तक थांबवण्यात यावं, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे.

'मोदींनी सांगितलं नसेल..'

'काही अतिउत्साही कार्यकर्त्यानी हा प्रकार केला असावा. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी त्यांची स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. ते अशा प्रकारे स्वत: कुणाला शिवाजी महाराजांसोबत तुलना करायला सांगणार नाहीत. मात्र या प्रकारामुळे पक्ष नेतृत्वावर टीका टिपण्णी होत आहे. पक्षश्रेष्ठींनी अशा लोकांना आळा घालावा,' असं मत शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.

भाजप-शिवसेनेच्या वादाबद्दल बोलताना अबू आझमींची जीभ घसरली, फडणवीसांना म्हणाले...

प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. आता हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाण्यात भावना दुखावल्याची तक्रार केली आहे.

काय म्हणाले संभाजीराजे?

'छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नाही. ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील,' असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 10:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading