सिंधुदुर्ग, 08 फेब्रुवारी : शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणी (santosh parab attack case) भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांना आजही सत्र न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यामुळे नितेश राणे यांचा न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) मुक्काम आणखी वाढला आहे. संतोष परब यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती, ती हल्लेखोरांना कुणी दिली? असं म्हणत सरकारी वकिलांनी नितेश राणे यांच्याकडे बोट केले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी नितेश राणेंची धावाधाव सुरूच आहे. आज पुन्हा एकदा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद पार पडला. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतली. पण, जामीन अर्जावर अद्याप कोणताही निर्णय दिला नाही. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज न्यायालयात नितेश राणे यांच्याबद्दल धक्कादायक आरोप केला आहे. ‘नितेश राणे हे जरी आमदार आहेत. तरी देखील वारंवार गुन्हे करण्याची त्यांना सवय झाली आहे. मारेकऱ्यांना दीड लाखाची सुपारी दिली गेली, त्यातील १० हजार दिले गेले हे सचिन सातपुतेने ३ नंबरच्या आरोपीला दिली’ असा दावा घरत यांनी केला. तसंच, तपास जून पूर्ण झालेला नाही. कोर्टात चार्जशीट दाखल नाही त्यामुळे जर नियमित जामीन मंजूर झाल्यास हल्ला प्रकरणात (तपासात) अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे जामीन मंजूर करू नये, अशी मागणी घरत यांनी केली. तर, गंभीर स्वरूपाची जखम नसल्याचं माने शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र संतोष परब यांना गंभीर स्वरुपाची जखम होती. छातीवर गंभीर जखमी करून मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला. अंगावर गाडी घालून पाडल्यावर संतोष परब यांच्या अंगावर मोटरसायकल पडली, संतोष परब यांच्या अंगावर गाडी पडल्यानंतर ती गाडी बाजूला न करता त्यांच्या डाव्या बाजूला छातीवर चाकूने हल्ला करणं हा पूर्वनियोजित कट आल्याचा युक्तीवाद प्रदीप घरत यांनी केला. सीसीटीव्ही मध्ये हे सगळं रेकॉर्ड झालं. हल्लेखोरांनी हल्ल्यात जी हत्यार वापरली ती ज्या ठिकाणा वरून घेतली त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासात मिळाली आहेत. . सुपारी सुपारी असं आम्ही म्हणतो असं नितेश राणेंचे वकील म्हणतात, या हल्ल्यातील हल्लेखोर हे पुण्यातील आहेत, तसंच ते सचिन सातपुते जे पुण्याचे आहेत त्यांच्या संपर्कातील आहेत, मग हे सुपारी देऊन केलं गेलं नाही का? असा सवालही प्रदीप घरत यांना केला. सचिन सातपुते आणि त्याचे सहकारी हे सुपारी घेणारे आहेत पण कोणी तरी सुपारी दिली, तो सुपारीबाज म्हणावाच लागेल ना? असं म्हणत प्रदीप घरत यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता युक्तिवाद केला. नितेश राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद संतोष परब यांना चाकूने नाही तर पेपर कटरने झाली आहे असे हायकोर्टाने म्हटलं आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आणि त्यावेळीच्या मारहाणीचा प्रकार न्यायालयाला सांगत आहेत. नितेश राणे यांची पोलीस कस्टडीमध्ये 48 तास चौकशी झाली. पोलीस कोठडीच्या पूर्वी देखील नितेश राणे यांनी तपासात सहकार्य केले आहे, असा युक्तिवाद नितेश राणेंचे वकील मानशिंदे यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







