• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक, पोलीस आयुक्तालयाबाहेर कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन

गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आक्रमक, पोलीस आयुक्तालयाबाहेर कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन

BJP MLA Gopichand Padalkar: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मड्डी वस्ती येथे हा प्रकार घडला आहे. या हल्ल्यानंतर पडळकरांचे कार्यकर्ते चांगेलच आक्रमक झालेले दिसले.

  • Share this:
    सोलापूर, 01 जुलै: भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञाताने दगड भिरकावला (Attack on BJP MLC Gopichand Padalkar). या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मड्डी वस्ती येथे हा प्रकार घडला आहे. या हल्ल्यानंतर पडळकरांचे कार्यकर्ते चांगेलच आक्रमक झालेले दिसले. गाडीवर दगड फेकल्याने गाडीची काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाहीये. गाडीवर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे. या सर्व प्रकारानंतर गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलीस आयुक्तालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ (Video of Stone Pelting on BJP MLC Gopichand Padalkar's Car) आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण पडळकरांच्या गाडीवर मोठा दगड फेकताना दिसून आला. गाडीची काच फोडल्यानंतर या व्यक्तीनं त्याठिकाणाहून पळ काढला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर हल्ला कऱण्यात आला. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, की बुधवारी सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात माझ्या बैठका सुरू होत्या. त्यानंतर मड्डी वस्ती येथील बैठकीला मी पोहोचलो. ही बैठक झाल्यावर मी गाडीत बसून निघालो होतो त्याचवेळी एका व्यक्तीने गाडीवर हल्ला केला. सोलापूर येथे माझा कुणासोबतही वाद नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा- सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक पडळकर पुढे म्हणाले, की माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी घाबरणार नाही. गाडीच्या पुढे मोठा दगड मारण्यात आला. गाडीची काच फुटली आहे. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीका करत आहेत. शरद पवार, संजय राऊत यांच्यावर सातत्याने पडळकर टीका करत आहेत. अशात त्यांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: