मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"या भूमीत राहून शत्रुचं गुणगान सहन करायला आता काही काँग्रेसचं सरकार नाही"

"या भूमीत राहून शत्रुचं गुणगान सहन करायला आता काही काँग्रेसचं सरकार नाही"

PFI ची स्थापना 2006 मध्ये केरळमध्ये झाली.

PFI ची स्थापना 2006 मध्ये केरळमध्ये झाली.

PFI ची स्थापना 2006 मध्ये केरळमध्ये झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 सप्टेंबर : केंद्रातील मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI), त्यांच्या सहकारी संघटना आणि सर्व आघाड्या बेकायदेशीर घोषित केल्या आहेत. केंद्राने या सर्वांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचं अधिकृत पत्रही प्रसिद्ध केलं आहे. पीएफआयवर बंदी घालण्याची तयारी आधीच सुरू झाली होती, त्यानंतर गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. ही बंदी योग्य आहे, असे मत भाजप नेते राम कदम यांनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले राम कदम -

या देशातच खायचं प्यायचं पण गुणगान मात्र, आपला जो शत्रु देश आहे, त्याचे गायचे. या देशाच्या भूमीवर पाकिस्तान जिंदाबादचे नारे या भारतावर प्रेम करणारा सच्चा नागरिक कसा काय, सहन करेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन, इथले जे आमचे युवक आहेत. त्यांची माथी भडकवून त्यांना अतिरेकी कारवायांमध्ये सहभाग घ्यावा, म्हणून त्यांना प्रेरित करायचे तर हा बदललेला भारत आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भारतात, देशद्रोही, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई होणारच. या भूमीत राहून शत्रुरात्राचं गुणगान करायला आता काही भारतात काँग्रेसचं सरकार नाही, त्यांनी सहन केलं असतं, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.

दरम्यान, पीएफआयवर केंद्र सरकारची कारवाई मंगळवारीही सुरूच होती. देशातील सहा राज्यांमध्ये पीएफआयच्या विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 90 हून अधिक कामगारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सीएफआय, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, रिहॅब इंडिया फाऊंडेशन, नॅशनल वुमन फ्रंट यासारख्या संबंधित संघटनांनाही बेकायदेशीर संघटना घोषित केलं गेलं आहे.

PFI ची स्थापना 2006 मध्ये केरळमध्ये झाली आणि ते भारतातील उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणासाठी एक नवीन सामाजिक चळवळ चालवण्याचा दावा करतात. मात्र, सुरक्षा यंत्रणांचा दावा आहे की, पीएफआय कट्टरपंथी इस्लामचा प्रचार करत आहे. या संस्थेची स्थापना केरळमध्ये झाली असून तिचं मुख्यालय दिल्लीत आहे.

हेही वाचा - 'तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा', राज ठाकरे भडकले

मंगळवारी संबंधित राज्यांच्या पोलिसांनी आपापल्या भागात छापे टाकले. छाप्यांदरम्यान पोलिसांनी आसाममध्ये 25, महाराष्ट्रात चार आणि दिल्लीत 30 जणांना ताब्यात घेतलं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातून 21जणांना, गुजरातमध्ये 10 जणांना आणि कर्नाटकातही अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आसामच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वेगवेगळ्या जिल्ह्यातून 25 पीएफआय कामगारांना अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Central government, Mumbai, Ram kadam, Terrorist