महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकांनंतर सत्तापालट होणार, बड्या नेत्यानं केला दावा

ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे कोणाचाही कोणाशी मेळ नसल्यासारखी आहे.

ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे कोणाचाही कोणाशी मेळ नसल्यासारखी आहे.

  • Share this:
    जालना, 22 नोव्हेंबर: राज्यात पदवीधर निवडणुकीची (Graduate Constituency election) रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र, पदवीधर निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट होणार असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aaghadi Government) जनता एका वर्षातच वैतागली आहे, अशी टीका देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी परतूर (जि. जालना) येथे आयोजित मेळाव्यानंतर प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हेही वाचा...संघर्ष अटळ... शॉकसाठी तयार राहा! अल्टीमेटमची आठवण करून देणारी मनसेची बॅनरबाजी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच विजयी होईल, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारमुळे त्रस्त आहे. महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीत पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय हे स्पष्ट होईल, असंही प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितलं. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा (Bihar Election) निवडणूक आणि देशातील काही राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सुशिक्षित तरुणांना भाजपला पसंती दिल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसेन, असा दावा दरेकर यांनी केला आहे. ठाकरे सरकार अस्थिर... प्रवीण दरेकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ठाकरे सरकारची अवस्था म्हणजे कोणाचाही कोणाशी मेळ नसल्यासारखी आहे. त्यामुळे राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांना वाढीव वीज बिलं देऊन सरकारनं जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं आहे. सरकार लबाड आहे. वाढीव वीज बिल माफ करण्याचा शब्द पाळला नाही. देवेद्र फडवीसांनी फेटाळलं 'ते' वृत्त... विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचं वृत्त फेटाळून लावलं आहे. भारतीय जनता पार्टी (BJP)आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे अमरावती शिक्षक मतदरासंघातील भाजप उमेदवार नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसेला सोबत घेणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर भाजप आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट करून त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं. दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेच्या वीज दरवाढीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच या आंदोलनात सहभागी होण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसेसोबत युती होऊ शकते असं सांगून नव्या राजकीय समीकरणांची चर्चा घडवून आणली होती. हेही वाचा..मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिलं 'हे' उत्तर मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप-मनसे युतीचं मोठं आव्हान राहणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: