जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तुम्ही नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा'; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची जीभ घसरली!

'तुम्ही नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा'; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची जीभ घसरली!

'तुम्ही नाच्याचं काम चांगलं करता, तेच करा'; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची जीभ घसरली!

भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑगस्ट : भाजप नेत्या चित्रा वाघ या आपल्या आक्रमक स्वभावामुळे ओळखल्या जातात. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रियाताई भाजपची काळजी सोडा, बारामतीची काळजी करा, या शब्दांत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला होता. यानंतर चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काय म्हणाल्या चित्रा वाघ? “ओ….भास्करशेठ तुम्ही आधी आणि आता ही “नाच्या” च काम चांगल करतां तेच करा. माझ्या नादी लागू नका,जेव्हा पूजा चव्हाण साठी मी लढत होती, तेव्हा कुठल्या बिळात घुसला होतात कि तोंडाला लकवा मारला होता तुमच्या, या शब्दात टीका करताना चित्रा वाघ यांची जिभ घसरली. तसेच पुढे त्या म्हणाल्या की, तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नाही तर आम्ही आमच्या जीवावर लढतो..याद राखा”, तर या शब्दात चित्रा किशोर वाघ यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तारही कधी होईल याबाबत स्पष्ट अशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या टप्प्यात कुणाकुणाला संधी मिळेल, याबाबतही माहिती समोर आलेली नाही. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान मिळालं नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान मिळेल का? असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांना काही दिवसांपूर्वी विचारला तेव्हा त्यांनी सूचक विधान केलं. हेही वाचा -  शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. याबाबत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं. महिलांना कोणी नाकारु शकत नाही. 50 टक्के महिला जनशक्ती आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला तुम्हाला मंत्री म्हणून दिसतील, असं सूचक विधान चित्रा वाघ यांनी केलं. तसेच “पक्षाचं हातात असतं कुणाला मंत्री करायचं, आम्ही कार्यकर्ते आहोत आणि काम करत राहू”, असंदेखील चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात