मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

'ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

'आघाडीच्या या ऑटोरिक्षा सरकारच्या तीन चाकात अनेक छिद्रे पडली असून हे सरकार म्हणजे पंक्चर सरकार आहे.'

'आघाडीच्या या ऑटोरिक्षा सरकारच्या तीन चाकात अनेक छिद्रे पडली असून हे सरकार म्हणजे पंक्चर सरकार आहे.'

'आघाडीच्या या ऑटोरिक्षा सरकारच्या तीन चाकात अनेक छिद्रे पडली असून हे सरकार म्हणजे पंक्चर सरकार आहे.'

मुंबई, 14 फेब्रुवारी : ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर होणाऱ्या विविध आरोपांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. 'महाभकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कारभारात महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळालीच नाही, तर उलट या वर्षभरात या सरकामधील अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी व मुजोरपणा राज्यातील जनतेसमोर उघड झाला आहे. त्यामुळे राज्यातील जनकेला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. आघाडीच्या या ऑटोरिक्षा सरकारच्या तीन चाकात अनेक छिद्रे पडली असून हे सरकार म्हणजे पंक्चर सरकार आहे,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे.

'राज्यातील जनतेने भाजपा-शिवसेना युतीला कौल दिला असतानाही, बेईमानी लबाडी व लाचारी करुन राज्यात महाभकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्राचा विकास करण्याचे स्वप्न त्यांनी राज्यातील जनतेला दाखविले. पण राज्याचा विकास करण्याऐवजी भाजप सरकारने सुरू केलेली विकास कामे व प्रकल्पांना स्थगिती देण्याचा सपाटा यांनी लावला. राज्याच्या विकास करण्याची जबाबदारी असलेल्या मंत्री मंडळातील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी, कारनामे व मुजोरपणा केला,' अशी टीकाही पाटील यांनी केली.

हेही वाचा - 'व्यक्ती कितीही मोठी असू द्या...जबाबदार असेल तर कारवाई झालीच पाहिजे', रोहित पवारांची प्रतिक्रिया

'पुण्यातील पूजा चव्हाणच्या आत्महत्येत ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचं नाव सध्या झळकत आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांवर आल्यानंतर व भाजपाने हा विषय ऐरणीवर आल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी या विषयी चौकशी करण्यात येईल असे जाहीर केलं,' असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

'जाणत्या राजाने भागनडीबाज मंत्र्याला पाठीशी घातले'

'ठाकरे सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली. संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही. पण याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निर्णय घेऊ असे सांगत महाविकास आघाडीमधील जाणता राजाने त्या मंत्र्यांना वा त्याच्या कथिक कृत्यांना पाठीशी घातलं,' असा आरोपही पाटील यांनी केला आहे.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil