मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणाला नवे वळण, भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक

आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणाला नवे वळण, भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक

संजय सानप हा बीड जिल्ह्यातील वडझरी गावातील उपसरपंच आहे.

बीड, 21 डिसेंबर : आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाला ( health department exam) नवे वळण मिळाले आहे. बीड (beed) जिल्ह्यात भाजपच्या युवा मोर्चाचा उपाध्यक्ष संजय शाहूराव सानप (sanjay sanap) याला पोलिसांनी अटक केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पेपर फुटी प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यात याआधीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 8 जणांना अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून संजय सानप याची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले,

संजय सानपला 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय सानप हा बीड जिल्ह्यातील वडझरी गावातील उपसरपंच आहे. तो बीड शहरात राहतो त्याचा मोठा बंगला आहे. संजय सानपच्या अटकेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे, टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET exam paper leak case) पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने (Pune Police cyber cell) मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आल्यावर आता आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरे (Sukhdev Dere) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली असून आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे. प्रकरणाची पाळेमुळे खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिले होते, त्यानुसार डेरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी माहिती हाती लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

First published: